आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अति प्रदूषणाचा परिणाम!:चंद्रपुरात कोसळला फेसळलेला पाऊस, पहिल्यांदाच पावसासोबत फेस पडल्याने परिसरात भीतीचे वातावरण

चंद्रपूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अति प्रदूषणाच्या परिणामामुळे हा फेसाळलेला पाऊस कोसळ्याचा पर्यावरण तज्ज्ञ डॉ. चोपणे यांनी दावा केला आहे.

चंद्रपूरात आज मुसळधार पाऊस झाला. या पावसासोबतच साबणासारखा फेस पडल्याचे समोर आले आहे. चंद्रपूर शहराजवळ असलेल्या दुर्गापूर कोळसा खाण परिसरात ही घटना उजेडात आली आहे.

झाडांवर-गवतावर-रस्त्यावर अनेक ठिकाणी हा पुंजक्याच्या स्वरूपातील फेस नजरेस पडला आहे. काही भागात तर या फेस पुंजक्यांचा वर्षाव बघायला मिळाला. सुमारे दिड ते दोन किलोमीटर परिसरात हा फेस पसरला आहे. ज्या भागात फेस पडला त्या भागात चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र आणि अनेक कोळसा खाणी आहेत. औष्णिक वीज केंद्र आणि कोळसा खाणीतून निघणाऱ्या वायूप्रदूषणासोबत पावसाच्या पाण्याचे संयुग झाल्याने हा फेस तयार झाल्याची शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. पहिल्यांदाच अशा प्रकारचा फेस पावसासोबत पडल्याने परिसरात भीती पसरली आहे.

बातम्या आणखी आहेत...