आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
वाई येथे गांजा शेती करून सातारा जिल्ह्यात खळबळ उडवून देणार्या दोघा फॉरेनर्सने सातारा जिल्हा कारागृहातही धुमाकूळ घातला आहे. कारागृहातील सीसीटीव्ही व शौचालयाच्या दरवाजाची मोडतोड केली. तसेच, विवस्त्र होवून करागृहातील कर्मचार्यांशी असभ्य वर्तन केले आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात कारागृहातील हवालदार सुरेश पाटील यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वाई शहरातील नंदनवन कॉलनीतील विष्णू श्री स्मृती या बंगल्यात हायड्रोपोनिक ग्रो सिस्टीमचा वापर करून बंगल्याच्या तीन बेडरूममध्ये, गॅलरीत, टेरेसवर कुंड्यामध्ये गांजाची लागवड केल्याने पोलिसांनी २९ किलो गांजा इतर साहित्य असा एकूण २१ हजार रूपंयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला होता. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्गीस व्हिक्टर मानका (वय ३१), सेबेस्टीन स्टेन मुलर (वय २५ दोन्ही रा.जर्मनी, सध्या रा.नंदनवन कॉलनी, वाई) या संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती.
दरम्यान २२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास संशयितांनी कारागृह कर्मचारी फाळके व ओव्हाळ या दोघांशी उद्धट वर्तन करण्यास सुरूवात केली. संशयितांनी या दोन्ही कर्मचार्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करून कारागृहातच विवस्ञ होऊन धिंगाणा घातला. हा प्रकार शांत झाल्यानंतर फाळके व ओव्हाळ हे सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पंधरा खोली विभागात गस्त घालत असताना त्यांना पाहून संशयितांनी चिडून जावून पंधरा खोली विभागातील बंदिस्त असलेल्या खोली क्रं 5 मधील सीसीटीव्ही कॅमेर्याची तसेच शौचालयाच्या दरवाजाची तोडफोड करून शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मुजावर करत आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.