आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मॅचवर बेटिंग:मुंबईमध्ये बेटिंगच्या आरोपात माजी क्रिकेटर रॉबिन मॉरिसला अटक, मॅच फिक्सिंगसोबतच अपहरणापर्यंतचे आरोप लागले आहेत

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये बेटिंग केल्याच्या आरोपात माजी फर्स्ट क्लास क्रिकेटर रॉबिन मॉरिसला रविवारी वर्सोवा पोलिसांनी ताब्यात घेतले. कॅनडामध्ये जन्म झालेल्या भारतीय रॉबिन मॉरिसने रणजी ट्रॉफीमध्ये मुंबई आणि ओडिशाचे नेतृत्व केले आहे.

रॉबिन मॉरिसने भारतासाठी 40 पेक्षा जास्त ‘ए’ सामन्यासह टी 20 सामने खेळले आहेत. 2018 मध्ये त्याचे तीन आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात बेटिंग आणि पिच डॉक्टरिंगबाबत बोलतानाच्या एक स्टिंग ऑपरेशनमध्ये नाव समोर आले होते.

खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे कारवाई झाली

रॉबिनला पकडल्यानंतर पोलिसांनी सांगितले की, वर्सोवामध्ये मॉरिसच्या घरी बेटिंग होत असल्याची पक्की माहिती आम्हाला मिळाली होती. या माहितीच्या आधारावर रेड मारली आणि यात तिघांना ताब्यात घेतले. यात मॉरिसचा समावेश आहे. पोलिसांनी मॉरिसच्या फ्लॅटमधून एक लॅपटॉप आणि मोबाईलही जप्त केला आहे.

मॅच फिक्सिंगसह अपहरणाचेही आरोप लागले आहेत

2019 मध्ये अल जजीरा न्यूजने एक स्टिंग ऑपरेशन केले होते आणि त्यावेळेस मॉरिसवर मॅच-फिक्सिंगमध्ये सामील असल्याचे आरोप लागले होते. मागच्या वर्षीच रॉबिन मॉरिसवर 2 लाख रुपयांसाठी एका लोन एजेंटला किडनॅप केल्याचा आरोप लागला होता.

बातम्या आणखी आहेत...