आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

निधन वृत्त:वर्षा उसगावकर यांना पितृशोक, गोव्याचे माजी मंत्री अच्युत उसगावकरांचे निधन 

पणजी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गोव्यात मुक्तीनंतर अधिकारावर आलेल्या स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांच्या मंत्रिमंडळामध्ये उसगावकर हे मंत्री होते.
Advertisement
Advertisement

मराठी सिने सृष्टीतील अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या वडिलांचे निधन झाले आहे. अच्युत उसगावकर यांची मंगळवारी गोव्यामध्ये प्राणज्योत मालावली. बांबोळीच्या गोमेकाॅ इस्पितळात सकाळी साडे सात वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सायंकाळी चार वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

गोव्यात मुक्तीनंतर अधिकारावर आलेल्या स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांच्या मंत्रिमंडळामध्ये उसगावकर हे मंत्री होते. सध्या ते मिरामार येथे राहत होते. वृद्धापकाळामुळे त्यांचे निधन झाले आहे. यामुळेच ते गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. त्यांच्या निधनाने गोव्यातील विविध समाज घटकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. गोव्याची पोर्तुगीज राजवटीतून 1961 साली मुक्तता झाली व मग महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या सत्तेचा काळ सुरू झाला. हा पक्ष 17 वर्षे सत्तेत होता. 

Advertisement
0