आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र पोलिस विभागात ट्रांसफर-पोस्टिंग रॅकेट सुरू असल्याचा आरोप करणाऱ्या राज्याच्या माजी इंटेलिजन्स कमिशनर रश्मी शुक्ला यांनी सोमवारी तेलांगाणा उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. यात त्यांनी राज्याकडून त्यांच्याविरोधात सुरू असलेला चौकशी थांबविण्याची मागणी केली आहे. स्वतःला विसल ब्लोअर म्हणत शुक्ल म्हणाल्या की, इतक्या मोठ्या रॅकेटचा मी भांडाफोड केला आणि आता माझ्याविरोधातच चौकशी केली जात आहे. न्यायालयाने शुक्ला यांची याचिका दाखल करुन घेतली आहे. लवकरच यावर सुनावणी होऊ शकते.
आज पुन्हा चौकशीसाठी शुक्ला यांना समन बजावला होता
रश्मी शुक्ला सथ्या हैदराबाद येथे CRPF मध्ये DG पदावर तैनात आहेत. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने त्यांना सोमवारी चौकशीसाठी दुसऱ्यांना समन बजावला होता. यापूर्वी शुक्ला यांना 28 एप्रिलला चौकशीसाठी बोलवण्यात आले होते, पण कोरोनाचे कारण देत त्यांनी चौकशीसाठी येण्यास नकार दिला होता. शुक्ला यांच्यावर आरोप आहे की, त्यांनी राज्य सरकार, होम डिपार्टमेंटच्या मंजुरीशिवाय अनेक मंत्री, IPS अधिकारी आणि ब्यूरोक्रेट्सचे फोन टॅप केले आणि ती रेकॉर्डिंग विरोधी नेत्यांना दिली.
2019 मध्ये झाली होती फोन टॅपिंग
आरोप आहे की, रश्मी शुक्ला यांनी 2019 मध्ये ही फोन टॅपिंग केली होती. महाराष्ट्र DGP संजय पांडे यांच्या आदेशानंतर मार्चच्या अखेरच्या आठवड्यात मुंबई सायबर सेलमध्ये एक FIR रजिस्टर झाली. परंतु, ही FIR अज्ञात व्यक्तीविरोधात गुप्त माहिती लिक करण्यासंबंधी होती.
25 ऑगस्ट 2020 ला जेव्हा रश्मी शुक्ला इंटेलिजन्स विंगच्या कमिशनर होत्या, तेव्हा त्यांनी एक गुप्त रिपोर्ट तयार करुन तत्कालीन DGP सुबोध कुमार जैसवाल यांना दिली होती. सुबोध कुमार जैसवालने ही रिपोर्ट आपल्या नोटिंगसह तत्कालीन ACS होम सीताराम कुंटेंना दिली होती आणि चौकशीची मागणी केली होती. याच रिपोर्टच्या आधारावर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज्यात मोठे ट्रांसफर रॅकेट सुरू असल्याचा आरोप करत सर्व रेकॉर्डिंग केंद्रीय गृह सचिवांना दिली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.