आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मातृशोक:माजी मंत्री महादेव जानकर यांच्या मातोश्री गुणाबाई जगन्नाथ जानकर यांचे निधन

सातारा17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काही महिन्यांपासुन त्या आजारी असल्याने त्यांच्यावर मुंबई येथे उपचार सुरु होते

महाराष्ट्र राज्याचे माजी दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांच्या मातोश्री श्रीमती गुणाबाई जगन्नाथ जानकर (९५) यांचे वृध्दापकाळाने राहत्या घरी पळसावडे येथे निधन झाले.

काही महिन्यांपासुन त्या आजारी असल्याने त्यांच्यावर मुंबई येथे उपचार सुरु होते, मात्र त्यांच्या तब्बेतीत काहीशी सुधारणा होताच त्यांना त्यांच्या मुळ गावी माण तालुक्यातील पळसावडे येथे आणण्यात आले होते. याठिकाणी माजी मंत्री जानकर यांचे मोठे बंधु दादासाहेब जानकर व अँड. सतिश जानकर हे दोघेही त्यांची सेवा करीत होते, तर नेते जानकर हे अधुन मधुन आपल्या आईला भेटण्यासाठी पळसावडे या आपल्या गावी येत होते. त्यांच्या पश्चात मुलगी रत्नाबाई विरकर, व ३ मुले , सुना, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार असुन त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच राजकिय, सामाजिक सह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी ‌आ. महादेव जानकर यांचे व त्यांच्या कुटुंबियांचे फोनवरुन सांत्वन केले, तर रात्री उशीरा गुणाबाई जानकर यांच्यावर पळसावडे येथील स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...