आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

पुणे कोरोना:शिवसेनेचे माजी नगरसेवक विजय मारटकर यांचे कोरोनामुळे निधन

पुणे17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
Advertisement
Advertisement

कोरोना आजाराने अजून एका नेत्याचा मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील शिवसेनेचे माजी नगरसेवक विजय मारटकर यांचे वयाच्या 67 व्या वर्षी कोरोनामुळे निधन झाले आहे. कोरोनासोबतच इतर आजारांनी ग्रासलेल्या मारटकर यांनी मंगळवारी सायंकाळी केईएम रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. 

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी श्वसनाचा त्रास जाणवल्यानंतर मारटकर यांना पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दोन दिवसानंतर त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली, पण परत त्रास सुरू झाल्याने पुण्यातील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू, त्यांची मृत्यूशी झूंझ अपयशी ठरली आणि मंगळवारी सायंकाळी विजय मारटकर यांचे निधन झाले.     

Advertisement
0