आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण प्रकरण:चंद्रपूर मारहाण प्रकरणी चौघांना पोलिस कोठडी तर 9 आरोपींची जामीनावर सुटका; जादुटोण्याच्या संशयावर झाली होती वृद्धांना मारहाण

चंद्रपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या आरोपींना एका दिवसाची पोलिस कोठडी

चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील वणी (खुर्द) गावात 'जादुटोणा भानामती' केल्याच्या संशयावरून मारहाण केल्याप्रकरणी अंधश्रध्दा निर्मूलन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अटकेत असलेल्या 13 आरोपींना काल 23 ऑगस्ट रोजी राजूरा येथील न्यायालयात हजर करण्यात आले. त्यापैंकी 4 आरोपींना एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तर उर्वरीत 9 आरोपींची जामीनावर सुटका करण्यात आली आहे. परंतु, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सदरील आरोपींना जिवती पोलीस स्टेशनमध्येच ठेवण्यात आले आहे.

वणी (खुर्द) गावातील हुके व कांबळे कुटुंब हे जादूटोणा करत असल्याच्या संशयावरुन काही लोकांनी त्यांना भर चौकात बांधून 21 ऑगस्ट रोजी जबर मारहाण केली होती. त्यांनतर स्थानिक पोलिसांनी अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलिस निरिक्षक संतोष अंबिके करीत आहेत.

या आरोपींना एका दिवसाची पोलिस कोठडी
सदरील प्रकरणात अंधश्रध्दा निर्मूलन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून एकूण 13 आरोपींना अटक करण्यात आली होती. 23 ऑगस्ट रोजी सर्व आरोपींना राजूरा येथील न्यायालयात हजर करण्यात आले होते. दरम्यान, न्यायालयाने दत्ता कांबळे, प्रकाश कोटंबे, अमोल शिंदे, संतोष पांचाळा या 4 आरोपींना एक दिवसीय पोलीस कोठडी सुनावली आहे.

या आरोपींची जामिनावर सुटका
या मारहाण प्रकरणात न्यायालयाने सुग्रीव शिंदे, बालाजी कांबळे, दादाराव कोटंबे, गोविंद येरेकर, केशव कांबळे, माधव तेलंगे, दत्ता भालेराव, सुरज कांबळे, सिध्देश्वर शिंदे या 9 आरोपींची जामीनावर सुटक केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, रात्री पोलिसांनी गावातील आणखी 14 लोकांना अधिक तपासासाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान त्यांची चौकशी सुरु असून अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही.

बातम्या आणखी आहेत...