आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:कंटेनर व कारच्या भिषण अपघातात चार जण जागीच ठार, तर एक गंभीर

खामगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

खामगांव-अकोला रोडवरील कोलोरी गावाजवळ असलेल्या गव्हाण फाट्याजवळ कंटेनरच्या धडकेत कार मधील चारजण जागीच ठार झाले आहेत, तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. अपघातग्रस्त कार अकोल्याकडे तर कंटेनर खामगावकडे येत होता. जखमीला उपचारासाठी शहरातील सामान्य रुग्णालयात उपचारार्थ आणण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (एमएच२७/एआर/३६३२) या क्रमांकाची कार अकोल्याकडे जात होती. गव्हाण फाट़याजवळ येताच खामगावकडे भरधाव येणाऱ्या (आरजे-१८/ जीबी/२५८९) या क्रमांकाच्या कंटेनरने कारला जबर धडक दिली. या अपघातात कारमधील चार जण जागीच ठार झाले असुून एक गंभीर जखमी झाला आहे. मृतकांमध्ये अकोल्यातील शिवनगर भागातील विनोद शंकरराव बावणे (वय ५०), पप्पू मनोहर जोशी (वय-४५), अतुल शंकरराव व्यवहारे (वय-४७), राहुल सातळे (वय-४०) यांचा समावेश आहे. तर अनिल मावळे नामक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. उपचारासाठी त्यांना येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातग्रस्त कार चालकाने ओव्हरटेक करण्याच्या नादात हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले. हा अपघात एवढा भीषण होता की, कार मधील मृतदेह गॅस कटरच्या साह्याने पत्रे कापून बाहेर काढण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्याचे ठाणेदार शेख, पोहेकॉ. खर्चे, जावेद गवई, खोले यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे शिवनगर येथे एकच शोककळा पसरली आहे.

बातम्या आणखी आहेत...