आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समृद्धी महामार्गाचा ग्राउंड झिरो रिपोर्ट:पूर्णत्वानंतर चार वर्षांची देखभाल ठेकेदारांकडे; सुरक्षेसह सौंदर्याचा मेळ साधण्याचाही प्रयत्न; आयकॉनिक स्ट्रक्चर्स आणि अद्ययावत तंत्रज्ञान

एका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • गोदावरी नदीवर पालखीचे तर वर्धा नदीवर चरख्याचे प्रतीक

ताशी दीडशे किलोमीटर वेगासाठी डिझाइन करण्यात आलेला समृद्ध महामार्गावर प्रवाशांची सुरक्षा हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. त्यासाठी “झिरो फन्टॅलिटी’ तत्त्वाच्या आधारे प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने स्वतंत्र उपाययोजना केल्याचा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा दावा आहे. त्याच निकषांनुसार या प्रकल्पावर नेमण्यात आलेल्या कन्सल्टंट कंपन्या आणि ठेकेदार कंपन्यांकडून काम करवून घेतले जात आहे. प्रकल्पाच्या हस्तांतरणानंतर पुढील चार वर्षे या महामार्गाच्या देखभालीची जबाबदारीही याच ठेकेदार कंपन्यांवर असणार आहे.

गोदावरी नदीवर पालखीचे तर वर्धा नदीवर चरख्याचे प्रतीक
बांधकामाचा पहिला टप्पा पूर्णत्वास जात असताना, “समृद्धी’च्या सुशोभीकरणाच्या प्रस्तावांचा विचार सुरू झाला आहे. यामध्ये त्या त्या टप्प्यावरील महतींचा विचार करून डिझाइन्स तयार केली जात आहेत. अहमदनगर जिल्ह्यातून हा महामार्ग जाताना गोदावरी नदीवरील पुलावर शिर्डीच्या साई मंदिराच्या किंवा “पालखी’च्या नक्षीची कमान केली जाणार आहे. वर्धा नदीवरील पुलावर सेवाग्रामची महती सांगणाऱ्या “चरख्या’ची अायकाॅनिक स्ट्रक्चर्स बांधली जात अाहेत.

वेगासोबतच सुरक्षेचाही विचार

 • दर पाच किलोमीटरवर आपत्कालीन सर्व्हिस रोड
 • इंटरचेंजच्या ठिकाणी पोलिस व फर्स्ट एड मदत केंद्र
 • आपत्कालीन स्थितीत रस्त्याचा हेलिपॅडसाठी होणार वापर
 • चालकांसाठी अधिकचा अलर्ट आणि रिअॅक्शन टाइम
 • व्हेलॉसिटी टेस्ट केलेले जर्मन तंत्रज्ञानाचे साइड बॅरिअर्स

समृद्धी महामार्गावरून कोणत्या डेस्टिनेशनला जाण्यासाठी कोणता इंटरचेंज वापराल?

 • IC १ ०० नागपूर
 • IC २ ०६ बुटीबोरी एमआयडीसी
 • IC ३ २९ सिंधी ड्राय पोर्ट
 • IC ४ ५७ वर्धा
 • IC ५ ८४ आर्वी-पूलगाव
 • IC ६ १०५ धामणगाव रेल्वे
 • IC ७ १३८ यवतमाळ-अमरावती
 • IC ८ १८२ कारंजा लाड
 • IC ९ २१० शेलू बाजार
 • IC १० २३८ मालेगाव-जहांगीर
 • IC ११ २८४ मेहकर
 • IC १२ ३१६ दुसरबीड
 • IC १३ ३३९ सिंदखेड राजा
 • IC १४ ३७० जालना
 • IC १५ ४०१ शेंद्रा एमआयडीसी
 • IC १५ A ४२२ औरंगाबाद
 • IC १६ ४४७ वेरूळ
 • IC १७ ४७० लासूर
 • IC १८ ४८८ वैजापूर
 • IC १९ ५२० शिर्डी
 • IC २० ५६४ सिन्नर
 • IC २१ ६०० नाशिक
 • IC २२ ६२५ इगतपुरी
 • IC २३ ६७० शहापूर
 • IC २४ ७०१ भिवंडी
 • IC २५ --- जेएनपीटी
बातम्या आणखी आहेत...