आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे:बीए, बीकॉम, बीएस्सीसह बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी यंदा मोफत सीईटी : उदय सामंत

पुणे14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इंजिनिअरिंग, फार्मसीची सीईटी जुलैअखेरीस अथवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात

राज्यात बारावीची परीक्षा रद्द झाल्यामुळे यंदा बीए, बी-कॉम, बीएस्सी अशा बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विनामूल्य सीईटी घेण्याचे संकेत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी दिले. इंजिनिअरिंग, फार्मसी अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी होणारी सीईटी जुलै अखेरीस किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होईल. त्याचे वेळापत्रक येत्या काही दिवसांत प्रसिद्ध करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

बारावीची परीक्षा रद्द झाल्यामुळे बिगरव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी घेण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली असून, त्यामध्ये कुलगुरू, सीईटी सेल आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागातील अधिकारी आहेत. सीईटी घेण्यासाठी दुप्पट केंद्रे उभारणार असून बारावीचे शुल्क भरल्याने सीईटीसाठी शुल्क आकारले जाणार नाही. सप्टेंबरपासून शैक्षणिक वर्ष सुरू करता येईल का, असा प्रयत्न करणार आहे. मात्र, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन ऑनलाइन शिक्षण सुरूच ठेवले जाईल,असे त्यांनी स्पष्ट केले.

मुक्त विद्यापीठाचे पुणे, बारामतीत उपकेंद्र
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची दोन उपकेंद्रे राज्यात सुरू करण्यात येणार आहेत. त्यापैकी एक उपकेंद्र पुण्यात तर दुसरे बारामती येथे होईल. त्याचप्रमाणे नागपूरच्या कविकुलगुरू कालिदास विद्यापीठाचे उपकेंद्रही पुण्यात सुरू करण्यात येणार अाहे. पूर्वघोषित टीचर्स अकादमीचे काम जवळपास पूर्ण झाले असून, लाॅकडाऊन शिथिल झाल्यावर ते पूर्णत्वास जाईल, असेही सामंत म्हणाले.

  • बारावीचे मूल्यमापन कसे होणार, हे लवकरच ठरेल, मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही
  • वाढीव शुल्क आकारले तर एफआयआर दाखल करणार
बातम्या आणखी आहेत...