आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी:विदर्भात दुर्मिळ ‘बघिरा’ व ‘रस्टी स्पॉटेड कॅट’चा मुक्तसंचार; विशेष नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील नवेगावात प्रथमच दर्शन, प्राणी झाले कॅमेऱ्यात ट्रॅप

भंडाराएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घ्या दुर्मिळ प्रजातीबद्दल

विदर्भातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील नवेगाव भागात दुर्मिळ ‘बघिरा’ म्हणजेच काळ्या बिबट्यांची जोडी आणि ‘रस्टी स्पॉटेड कॅट’ दोन पिलांसह आढळून आली. हे कॅमेऱ्यात ट्रॅप झाले आहे. नवेगाव नागझिरा टायगर रिझर्व्ह (एनएनटीआर) प्रकल्पातील कॅमेरा ट्रॅपिंगमधला डेटा डेहराडूनच्या वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला पाठवण्यात आला आहे. डॉ. बिलाल हबीब यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोत एनएनटीआर लँडस्केपचा उल्लेख केला आहे. मात्र, ही नर-मादी जोडी नेमक्या कोणत्या ठिकाणी आढळली, याचा उल्लेख त्यांनी टाळला आहे.

डॉ. बिलाल हबीब यांनी शेअर केलेल्या आणखी एका फोटोत ‘रस्टी स्पॉटेड कॅट’ आपल्या दोन पिलांसह दिसत आहे. मांजरीची ही प्रजाती झाडांवर दिसून येणारी असून क्वचितच ती जमिनीवर आढळते.
डॉ. बिलाल हबीब यांनी शेअर केलेल्या आणखी एका फोटोत ‘रस्टी स्पॉटेड कॅट’ आपल्या दोन पिलांसह दिसत आहे. मांजरीची ही प्रजाती झाडांवर दिसून येणारी असून क्वचितच ती जमिनीवर आढळते.

फोटोत काळ्या रंगाचा बिबट्या आणि त्याच्यासोबत जंगलात विहार करणारी मादी एकत्र दिसत आहे. कर्नाटकच्या काबिनी अभयारण्यात ५ वर्षांपूर्वी साया (नर) आणि क्लिओ (मादी) ही काळ्या रंगाच्या बिबट्याची जोडी सर्वांत पहिल्यांदा आढळून आली होती. २०१९-२० मध्ये विदर्भातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पासोबतच पेंच व्याघ्र प्रकल्पातही एकट्याने फिरणारे काळे बिबट आढळले होते.

माहिती देऊ शकत नाही
एनएनटीआर फील्ड स्टाफकडून कॅमेरा ट्रॅप मोहीम राबवली जाते. त्यात कैद झालेल्या सर्व माहितीच्या विश्लेषणासाठी ते डब्ल्यूआयआयकडे पाठवली जाते. ही प्रजाती नेमकी कुठे आढळली, याची माहिती देऊ शकत नाही. - मणिकंद रामानुजम, क्षेत्र संचालक, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प.

जाणून घ्या दुर्मिळ प्रजातीबद्दल
अधिवास नष्ट होणे आणि शिकारीमुळे भारतीय बिबट्या एक असुरक्षित प्रजाती म्हणून सूचिबद्ध आहेत. मेलेनिस्टिक (काळसर) बिबट्यांचा एएसआयपी रंग ठरवणाऱ्या जनुकात (ज्याचा संबंध त्वचा, डोळे, केसांच्या रंगद्रव्याशी संबंधित आहे) बदल होऊन असे उदाहरण पाहावयास मिळते. एनएनटीआरमध्ये आढळलेल्या बिबट्याचा रंग फिकट काळा असून जनुक अभिव्यक्तीची समस्या असू शकते.


बातम्या आणखी आहेत...