आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशभक्तांसाठी खूशखबर!:कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी धावणार मोफत 'मोदी एक्सप्रेस', आमदार नितेश राणे यांच्याकडून घोषणा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गणेशोस्तवाकरिता कोकणात जणाऱ्या नागरिकांसाठी 'मोदी' एक्स्प्रेस धावणार आहे. भाजपा आमदार नितेश राणे यांनी ट्वीट करत ही माहिती दिली आहे.

विशेष म्हणजे हा प्रवास मोफत असणार असून त्यासाठी आरक्षण करावं लागणार आहे, असेही नितेश राणे यांनी सांगितले.

'दरवर्षी मी आपल्यासाठी गणपतीला बसेस सोडतो. पण यावर्षी आम्ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानणार आहोत. नारायण राणेंना केंद्रीय मंत्रीमंडळात स्थान देऊन नरेंद्र मोदींनी कोकणाला आशीर्वाद दिला आहे. त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी गणेश चतुर्थीसाठी मोदी एक्स्प्रेस सोडत आहोत,' अशी माहिती नितेश राणेंनी दिली.

१८०० नागरिकांसाठी ही ट्रेन सोडण्यात येणार असून दादरहून कणकवली, वैभववाडी आणि सावंतवाडीपर्यंत धावणार आहे. प्लॅटफॉर्म नंबर ८ वरुन ही ट्रेन सुटणार आहे. तसंच प्रवासात एक वेळचे जेवणदेखील दिलं जाणार आहे. अशी माहिती नितेश राणे यांनी दिली.

बुकिंग करण्यासाठी नितेश राणे मतदारसंघातील मंडळ अध्यक्षांचे क्रमांक दिले आहेत. देवगडमधील संतोष किंजवडेकर आणनि अमोल तेडी, वैभववाडीसाठी नासिरभाई काजी आणि कणकवलीसाठी मिलिंद मिस्री व संतोष कानडे यांना 27 ऑगस्ट ते 1 सप्टेंबरदरम्यान फोन करुन जागा आरक्षित करायची आहे. अशी माहिती राणे यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...