आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गडचिरोली:एक कोटींचे बक्षीस असलेल्या नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य आर.के. याचा दीर्घ आजाराने मृत्यू

हेमंत डोर्लीकर / गडचिरोली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य अक्किराजू हरगोपाल ऊर्फ रामकृष्ण ऊर्फ आर.के याचा 14 ऑक्टोबर रोजी दीर्घ आजाराने मृत्यू झाला आहे. तो ६३ वर्षांचा होता. त्याच्यावर 1 कोटींचे बक्षीस होते. नक्षलवाद्यांचा केंद्रीय प्रवक्ता अभय याने यासंदर्भात एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे आर.के.याचा सकाळी 6 वाजता मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट करत त्याच्या पार्थिवावर अंतिम संस्कारही करण्यात आल्याचे सांगितले आहे.

पोलिस सुत्रांनी सुद्धा अक्किराजूची किडनी फेल झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले आहे. दक्षिण बस्तरच्या जंगलात त्याचा मृत्यू झाला असे सांगितले जात आहे. तत्कालीन मुख्यमंत्री राजशेखर रेड्डी यांनी 2004 साली नक्षलवाद्यांसमोर शांतता प्रस्ताव ठेवला होता. 4 सप्टेंबर 2004 ला पीपल्स वॉर आणि जनशक्ती या ग्रूपसोबत आंध्रप्रदेश सरकारने चर्चा केली. आर.के.ने माओवाद्यांच्या एका दलाचे नेतृत्व केले होते.

बातम्या आणखी आहेत...