आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिबट्याचा थरार:घरात बिबट्या शिरल्यानं खळबळ; वृद्ध महिलेने प्रसंगावधान दाखवल्यानं टळला मोठा अनर्थ, रेस्क्यू टिमकडून सुखरूप सुटका

गडचिरोली | हेमंत डोरलिकरएका दिवसापूर्वी
  • कॉपी लिंक

गडचिरोलीमध्ये बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. जिल्ह्यात मानव आणि वन्यजीव संघर्ष सुरू असतानाच घरात बिबट घुसल्याने गावात एकच खळबळ उडाली. वनपरिक्षेत्र उत्तर धानोरा अंतर्गत येणाऱ्या मोहली नियत क्षेत्र अंतर्गत येत असलेल्या मेटे जांगदा या गावी पहाटेच्या सुमारास कुत्र्याच्या शिकार करण्याकरिता पाठलाग करत बिबट्या चक्क घरात घुसल्याने गावात एकच खळबळ उडाली.

प्राप्त माहितीनुसार बुधवारी पहाटेच्या सुमारास कुत्र्याचा पाठलाग करत बिबट्या घरात घुसल्याने आतमध्ये असलेल्या वृद्ध महिलेने त्वरित आपला जीव वाचवत कसेबसे बाहेर पडून कुलूप लावले आणि बिबट्याला जेरबंद केले. या घटनेची माहिती गावातील लोकांनी कळताच एकच गर्दी केली.

बिबट्या घरात घुसल्याची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी त्याठिकाणी दाखल झाले. एवढेच नव्हे तर गडचिरोली तालुक्यात वाघांना जेरबंद करण्यासाठी रॅपिड रेस्क्यू टीम मागील सात दिवसांपासून वाघांच्या शोधात आहे. आता तीच टीम मेटे जांगदा येथे दाखल झाली. या टिमने बिबट्याची सुटका केली.

बातम्या आणखी आहेत...