आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे तपासणीदरम्यान काही भेगा आढळल्या आहेत. गेटवे ऑफ इंडियाच्या संवर्धन आणि दुरुस्तीसाठी 8,98,29,574 रुपये अंदाजित करण्यात आले आहेत.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्री किशन रेड्डी यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय विभागाने सविस्तर स्थळ व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. ‘गेटवे ऑफ इंडिया’च्या संवर्धन आणि दुरुस्तीसाठी 8,98,29,574 रुपये खर्चाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
तपासणीदरम्यान आढळले तडे
गेटवे ऑफ इंडियाच्या पृष्ठभागावर तडे आढळून आले, परंतु एकूण रचना चांगल्या स्थितीत असल्याचे दिसून आले, अशी माहिती संसदेत देण्यात आली. केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी किशन रेड्डी यांनी लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.
स्मारक महाराष्ट्र शासनाच्या संरक्षणाखाली
गेटवे ऑफ इंडियाच्या नुकत्याच केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटमध्ये समोरच्या भागाला तडे गेले आहेत का, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. ते म्हणाले की, ‘गेटवे ऑफ इंडिया, मुंबई हे केंद्रीय यंत्रणाचे संरक्षित स्मारक नाही. ते महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालय विभागाच्या संरक्षणाखाली आहे. तपासणीदरम्यान पृष्ठभागावर काही भेगा आढळल्या. ते जतन करण्याच्या चांगल्या स्थितीत आहे.’
या संदर्भात केंद्र सरकारला कोणताही अहवाल सादर करण्यात आला आहे का आणि असल्यास त्या अहवालातील निष्कर्ष काय आहेत, या प्रश्नाच्या उत्तरात मंत्री म्हणाले की, यासंदर्भात कोणताही अहवाल केंद्र सरकारला सादर करण्यात आलेला नाही. पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालयाकडून सरकारला जीर्णोद्धार प्रस्ताव आला आहे का, असे विचारले असता रेड्डी म्हणाले की, ‘भारत सरकारकडे असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही.’
दुरुस्तीसाठी 8,98,29,574 रुपये अंदाजित
पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय विभागाने विस्तृत स्थळ व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे आणि "गेटवे ऑफ इंडियाच्या संवर्धन आणि दुरुस्तीसाठी 8,98,29,574 रुपये अंदाजित केले आहेत.
जॉर्ज पंचम यांच्या आगमनाच्या स्मरणार्थ बांधकाम
ब्रिटिश सम्राट किंग जॉर्ज पंचम यांच्या आगमनाच्या स्मरणार्थ डिसेंबर 1911 मध्ये गेटवे ऑफ इंडिया बांधण्यात आला होता. संरचनेचे बांधकाम 1924 मध्ये पूर्ण झाले आहे.
या संदर्भात दिव्य मराठीने या आधी देखील वृत्त प्रकाशित केले होते..
भारताच्या प्रवेशद्वाराला तडे:मुंबईचे ताजमहल संकटात, पुरातत्व विभागाच्या अहवालातून धक्कादायक बाब समोर
मुंबई शहराची शान असलेले 'गेट वे ऑफ इंडिया' सध्या चर्चेत आहे. गेट वे ऑफ इंडिया म्हणजे मुंबईच्या पर्यटनाचा क्षेत्राचा मानबिंदू होय. उन्हाळा असो वा पावसाळा पर्यटकांचे प्रेम मात्र गेट वे ऑफ इंडियासाठी कमी होत नाही. 100 वर्षांहून अधिक काळाचा इतिहास असलेल्या गेट वे ऑफ इंडियाला मुंबईचे ताजमहल म्हणून ओळखले जाते. वर्षानुवर्षे अजस्त्र लाटा व कित्तेक वादळे झेलणाऱ्या गेट वे ऑफ इंडिया विषयी गेल्या काही दिवसात चिंता वाढवणाऱ्या बातम्या समोर आल्या आहेत.
गेट वे ऑफ इंडियाच्या वास्तूला तडे गेल्याच्या अनेक बातम्या सध्या चर्चेत आहेत. गेट वे ऑफ इंडियाला गेलेल्या तड्यांमुळे ही वास्तू कमकुवत होत असल्याची भीती अनेकांनी व्यक्त केली आहे. या ऐतिहासिक वास्तूला केवळ तडेच नाही तर काही ठिकाणी वनस्पतींची वाढ सुद्धा झाली आहे. राज्य पुरातत्त्व विभागाने महाराष्ट्र सरकारला गेट वे ऑफ इंडियाच्या संवर्धनाचा प्रस्ताव मांडला आहे. ही वास्तू देशातीलच नव्हे तर परदेशी पर्यटकांसाठी देखील आकर्षणाचा विषय ठरते. अशा या वास्तूला तडे जाणे म्हणजे महाराष्ट्राच्या पर्यटनाच्या दृष्टीने गंभीर बाब समजली जात आहे. पूर्ण बातमी वाचा...
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.