आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य सेवा:श्वसनासंबंधित 20 आजारांसाठी मोफत उपचार करा, अन्यथा 5 पट दंड आकारला जाईल- राजेश टोपे

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

श्वसनासंबंधित 20 आजारांसाठी रुग्णालयांना मोफत उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आणि कोरोनाच्या परिस्थितीबाबत आढावा घेण्यासाठी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठक बोलावली होती. यादरम्यान आरोग्यमंत्री बोलत होते. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस प्रमुखांशी चर्चा केली.

यावेळी राजेश टोपे यांनी सांगितले की, 'महात्मा ज्योतिबा फुले जनारोग्य योजनेबाबत सरकारने विशेष आदेश जारी केले आहेत. श्वसनासंबंधित 20 आजारांसाठी मोफत उपचार करावे. महात्मा ज्योतिबा फुले जनारोग्य योजनेतील रुग्णालयात मोफत उपचार करावे. उपचारासाठी पैसे घेतले तर 5 पट दंड लावण्याचा, परवाना रद्द करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे. तसेच, शेवटच्या क्षणी आलेल्या रुग्णांचे प्रमाण मृतांमध्ये जास्त आहे. ग्रामीण भागात रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत,' असेही टोपे यांनी सांगितले.

टेलीआयसीयुचा विस्तार करण्याची आवश्यकता- आरोग्यमंत्री

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, राज्यात सुरू असलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून कोरोना रुग्णांना मोफत उपचार मिळतील यासाठी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तालुकास्तरावर रुग्णवाहिका उपलब्ध राहतील याकडे जिल्हाधिकऱ्यांनी लक्ष घालावे. लवकर निदानासाठी काही जिल्ह्यांमध्ये कॉण्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. चाचण्यांची क्षमता पुरेशी असून त्याचा पूर्णपणे वापर करण्याचे आवाहन आरोग्मंत्र्यांनी केले. टेलीआयसीयु सुविधा राज्यात सुरू झाली असून भिवंडी मध्ये त्याच्या वापराने फायदा होत असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. जेथे विशेषज्ञ उपलब्ध नाही तेथे ही सुविधा फायदेशीर ठरत असल्याचे सांगतानाच सध्या सीएसआरच्या माध्यमातून ही योजना सुरू असून राज्यात तिचा विस्तार करण्याची आवश्यकता असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...