आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिल परब यांची मागणी:कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना 50 लाख रुपये द्या

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • परिवहनमंत्री अनिल परब यांची विजय वडेट्टीवारांकडे मागणी

कोरोना संसर्ग होऊन मृत्युमुखी पडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासनाकडून ५० लाख रु. आर्थिक मदत देण्याची मागणी परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे.

मार्च २०२० पासून कोरोना महामारीच्या काळात शासनाच्या निर्देशानुसार अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची वाहतूक, लाखो परप्रांतीय मजुरांना राज्याच्या सीमेपर्यंत नेऊन सुखरूप पोहोचवणे, हजारो विद्यार्थ्यांना परराज्यातून त्यांना सुखरूप घरी घेऊन येणे, ऊसतोडणी मजुरांना कारखान्यांपासून त्यांच्या घरापर्यंत घेऊन जाणे, अत्यावश्यक व कृषिजन्य मालाची वाहतूक करणे, वैद्यकीय ऑक्सिजन आणण्यासाठी टँकरला चालक पुरवणे, शासकीय रुग्णवाहिकांना चालक पुरवणे अशा अनेक कामांमध्ये धोका पत्करून एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आपली सेवा बजावलेली आहे.

एसटीच्या कर्मचाऱ्यांनीदेखील शर्तीचे प्रयत्न केले आहेत. ३१ डिसेंबर २०२० अखेर मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांपैकी १० कर्मचाऱ्यांच्या वारसांना ५० लाख रुपयांची मदत महामंडळाच्या आर्थिक निधीतून केली आहे. आता इतर मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अशीच मदत करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी मंत्री वडेट्टीवार यांच्याकडे केले आहे.

बातम्या आणखी आहेत...