आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाना साधला. 'पक्षाचे फक्त 4 खासदार निवडून येतात, त्या पक्षाच्या नेत्याला तुम्ही लोकनेते म्हणता, मग 303 खासदार निवडून आणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय म्हणायचे?' असा सवाल आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. पुणे पदवीधर मतदार संघाचे भाजपचे उमेदवार संग्रामसिंह देशमुख यांच्या प्रचारार्थ सांगलीत सोमवारी आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात पडळकर बोलत होते.
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर बोचरी टीका केल्यानंतर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी पाटील यांच्यावर हल्लाबोल केला. यावर भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रतिक्रिया दिली. 'काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून अनेकदा केंद्रातील नेतृत्वावर टीका केली जाते. ज्या पक्षाचे चार खासदार निवडून येतात, त्या पक्षाच्या नेत्याला तुम्ही लोकनेते म्हणता, मग 303 खासदार निवडून आणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदींना काय म्हणायचे? मोदींवर टीका करणा-यांनी स्वतःच्या पक्षाची स्थिती समजून घेणे गरजेचे आहे,' असा टोला पडळकरांनी लगावला.
आमचे चार खासदार 303 वर भारी- अमोल मिटकरी
'आमचे 4 खासदार 303 वर भारी आहेत. जसे 56/55/44 (105) ला भारी. बारामतीत डिपॉझिट का जप्त झाले, यावर भाष्य केले असते, तर समजू शकलो असतो. प्रसिद्धी पिसाटांना थोडे चर्चेत राहायला अधून मधून मानसिक झटके येतात,' असा टोला राष्ट्रवादीचे विधान परिषदेवरील आमदार अमोल मिटकरी यांनी गोपीचंद पडळकरांना लगावला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.