आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसवर जोरदार टीकास्त्र डागले आहे. जर छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर जितेंद्रचा जितुद्दीन, अजितचा अझरूद्दीन, शरदचा शमशुद्दीन आणि रोहितचा रजाक झाला, असता असे त्यांनी म्हटले आहे. गेली काही दिवस शिवरायांबद्दल होणाऱ्या वादग्रस्त विधानामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.
नेमके काय म्हणाले पडळकर?
भाजपचे आमदार गोपींचद पडळकर म्हणाले की, जितेंद्र आव्हाड हे छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, हिंदू देव देवतांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करत आहेत. कदाचित शरद पवार हे जितेंद्र आव्हाड याच्या तोंडून बोलत असतील, असे मला वाटते. जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर जितेंद्रचा जितुद्दीन, अजितचा अझरूद्दीन, शरदचा शमशुद्दीन, आणि रोहितचा रजाक झाला असता, असे टोला पडळकरांनी लगावला आहे.
पवारांची कूटनीती
पुढे गोपीचंद पडळकर म्हणाले की, अशा प्रकरणी वक्तव्ये करणे आणि घाण राजकारण करणे ही पवारांची 50 वर्षांपासूनची कूटनीती आहे. केवळ मतांसाठी किती खालच्या पातळीला जावे याचे राजकारण पवारांनी कसे केले हे महाराष्ट्रातील जनता पाहात आहे. हिंदू लोकांनी हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे, यावर राज्यातील जनताच त्यांना योग्य उत्तर देईल असे पडळकरांनी म्हटले आहे.
नेमके प्रकरण काय?
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. आव्हाड म्हणाले होते की, मुघलशाही नसती तर शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा इतिहासच लिहिला गेला नसता. यावरून भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. आव्हाडांच्या वक्तव्यानंतर पडळकर पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.
काही दिवसांपूर्वी अजित पवारांवर टीका
अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते, तर ते स्वराज्य रक्षक होते, असे वक्तव्य केले होते. यावर बोलताना पडळकर म्हणाले की, असे म्हणणाऱ्यांची कदाचीत सुंता झाली असती. प्रसारमाध्यमांच्या मित्रांनी जाऊन खरी परिस्थिती काय आहे हे तपासायला हवे असे आमदार पडळकर यांनी म्हटले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.