आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Got 80% Marks In 12th Standard Examination, But Due To Low Marks In English Subject, The Student Committed Suicide

12 वी निकाल:बारावीच्या परीक्षेत मिळाले 80% गुण, पण इंग्रजी विषयात कमी मार्क मिळाल्यामुळे विद्यार्थ्याने केली आत्महत्या

अमडापुर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमडापूर येथून जवळच असलेल्या कव्हळा येथील बारावीच्या परीक्षेत वाणिज्य शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने इंग्रजीत कमी गुण मिळाल्याने शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. शेतकऱ्याचा मुलगा असलेल्या विनायक संतोष लांडे याला बारावीच्या परीक्षेत ८० टक्के गुण मिळाले होते. मृत विनायक हा शेतकरी कुटुंबातील आहे. त्याची बहीण अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. त्याच्या घरी दहा एकर शेती आहे.

कव्हळा येथील विनायक याचा मृतदेह शुक्रवारी १७ जुलै रोजी पहाटे ५ वाजता शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याने आत्महत्या करण्यामागचे कारण बारावीच्या परीक्षेत इंग्रजी विषयात कमी गुण मिळाल्याचे सांगितले जात आहे. ८० टक्के गुण प्राप्त झाले असतानाही इंग्रजीतील कमी गुणामुळे त्याला नैराश्याने ग्रासले अन त्याने आत्महत्येचा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. याप्रकरणी तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दखल करून घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्याचा मृतदेह खाली उतरवून शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर शोकाकूल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.दरम्यान, विनायक याने याच कारणामुळे आत्महत्या केली का ? आणखी काही कारण आहे, याचा तपास आता पोलिस करत असल्याचे सूत्रांनी सांगितले.