आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:शासकीय कार्यालयांत आता ३३% कर्मचारी, १००% अधिकारी अनिवार्य

मुंबई3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • पोलिस, गृहरक्षक दल, नागरी संरक्षण दल,आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग आदी ठिकाणी 100 टक्के उपस्थिती आवश्यक

कोरोनावर मात करण्यासाठी १७ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला असला तरीही शासकीय कामकाजाचा गाडा पूर्ववत सुुरू करण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने मंगळवारी सुधारित आदेश जारी केला आहे. या नव्या आदेशानुसार मुंबई, पुणे वगळता अन्य ठिकाणी सचिव, अधिकारी यांची १०० टक्के, तर इतर कर्मचाऱ्यांची ३३ टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. यापूर्वी खबरदारीचा उपाय म्हणून शासकीय कार्यालयांमध्ये ५ टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. मुंबई महानगर प्रदेश क्षेत्र, मालेगाव, पुणे, पिंपरी-चिंचवड पालिका क्षेत्रातील कार्यालयांत मात्र पूर्वीप्रमाणे ५% उपस्थिती कायम ठेवण्यात आली. कामाच्या ठिकाणी किमान तीन फूट अंतर ठेवावे, अधिकारी, कर्मचारी यांनी स्मार्टफोनवर आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करावे, अशी सूचनाही देण्यात आली आहे.

या ठिकाणी १००% उपस्थिती अनिवार्य : पोलिस, गृहरक्षक दल, नागरी संरक्षण दल, संरक्षण व सुरक्षा सेवा, आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग, राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र, सीमाशुल्क विभाग, भारतीय अन्न महामंडळ, नेहरू युवा केंद्र, राष्ट्रीय छात्र सेना, महापालिका, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा, आपत्ती व्यवस्थापन व अानुषंगिक सेवा मात्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित राहतील, असेही आदेशात नमूद आहे.