आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ताफ्यात असलेल्या शासकीय वाहनांचा अपघात, सुदैवाने कुणीही जखमी नाही

हिंगोली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ताफ्यातील एका स्विफ्ट कार चालकाने अचानक ब्रेक दाबले. त्यामुळे त्या पाठीमागे असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाची जीप कार वर आदळली.

हिंगोली तालुक्यातील नरसी नामदेव येथे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या ताब्यातील तीन वाहने एकमेकांना धडकल्याने अपघात झाल्याची घटना शुक्रवारी ता. 6 दुपारी अडीच वाजता घडली आहे. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही मात्र शासकीय वाहनांचे नुकसान झाले.

हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज दुपारी शासकीय विश्रामगृहात अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधून नरसी नामदेव येथे संत नामदेव महाराजांच्या दर्शनासाठी निघाले. प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत सर्व विभागांचे अधिकारी नरसी नामदेव कडे निघाले. त्यांच्या वाहनांचा ताफा नरसी नामदेव जवळ पोहोचल्यानंतर ताफ्यातील एका स्विफ्ट कार चालकाने अचानक ब्रेक दाबले. त्यामुळे त्या पाठीमागे असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाची जीप कार वर आदळली. तर त्या पाठीमागे असलेल्या हिंगोलीच्या अग्निशामक दलाच्या वाहनचालकाला ही वाहना वर नियंत्रण मिळवता आले नाही. त्यामुळे अग्निशमन दलाचे वाहन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वाहनावर धडकले. या अपघातामध्ये तीनही वाहनांचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.

या अपघातानंतर अग्निशामक दलाचे वाहन व स्विफ्ट कार बाजूला काढण्यात आली तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वाहनाचे किरकोळ नुकसान झाल्याने बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्याचे वाहन पुन्हा ताफ्यात सामील झाले.

दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नरसी नामदेव येथे भेट देऊन संत नामदेव महाराजांचे समाधीचे दर्शन घेतले. यावेळी आमदार तानाजी मुटकुळे सतीश विडोळकर, डॉ. रमेश शिंदे, नारायण खेडेकर, यांच्यासह नरसी नामदेव संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी नरसी नामदेव येथील विकास कामांसाठी केंद्र व राज्य शासनाकडे शिफारस करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती आमदार मुटकुळे यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...