आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकरे सरकारची मोठी घोषणा:मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख, अशोक चव्हाणांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मराठा आरक्षण आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख रूपये रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातलगांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. ही रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीद्वारे दिली जाणार आहे. एकूण 34 कुटुंबियांसाठी मदतीची रक्कम संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

संबंधित कुटुंबाना 10 लाख रुपये देण्याची घोषणा मागील सरकारच्या काळात करण्यात आली होती. पण प्रत्यक्षात केवळ 15 कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्यात आली होती. मागील सरकारचे हे आश्वासन महाविकास आघाडी सरकार पूर्ण करेल. या कुटुंबियांना राज्य शासनाकडून प्रत्येकी 10 लाख रुपये देण्यात येतील, असा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मराठा समन्वयकांना दिला होता.

उद्धव ठाकरेंनी दिलेल्या आश्वासनानुसार मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 2 कोटी 65 लाख रुपयांचा निधी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना वर्ग करण्यात आला आहे. आजवर शासनाची मदत न मिळालेल्या 19 वारसांना प्रत्येकी 10 लाख तर यापूर्वी 5 लाख रुपये मिळालेल्या 15 वारसांना प्रत्येकी आणखी 5 लाख रुपये या निधीतून दिले जातील.

अशोक चव्हाणांनी काय म्हणाले?

दरम्यान, अशोक चव्हाण म्हणाले, मराठा आरक्षण आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी 10 लाख रूपये देण्याच्या आश्वासनाची महाविकासआघाडी सरकारने पूर्तता केली असून, मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून एकूण 34 कुटुंबांसाठी मदतीची रक्कम संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना वर्ग करण्यात आली आहे.

ही आर्थिक मदत मिळणाऱ्या 34 कुटुंबांमध्ये औरंगाबाद 6, जालना 3, बीड 11, उस्मानाबाद 2, नांदेड 2, लातूर 4, पुणे 3, तर अहमदनगर, सोलापूर व परभणी जिल्ह्यातील प्रत्येकी एका कुटुंबाचा समावेश आहे. याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

बातम्या आणखी आहेत...