आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपालांचा चिपळूण दौरा:महापूरामुळे चिपळूणकरांवर ही दुर्दैवी वेळ; संपूर्ण देश पूरग्रस्तांच्या दु:खात सहभागी - राज्यपाल भगतसिंग कोश्यारी

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शासनाने तातडीने मदत द्यावी - भगतसिंग कोश्यारी

अतिवृष्टीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत महापूर आला आहे. रायगड, कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. महापूरामुळे कित्येक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. त्यामुळे राज्यात 150 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आज मंगळवारी चिपळूण दौऱ्यावर आले होते.

दरम्यान, त्यांनी चिपळूणकरांशी संवाद साधला असून तातडीने मदत पोहोचवण्याच्या सूचना दिल्या सरकारला दिल्या आहेत. महापूरामुळे चिपळूणकरांवर ही दुर्दैवी वेळ आली आहे, अशावेळी संपूर्ण देश पूरग्रस्तांच्या दु:खात सहभागी असल्याचे राज्यपालांनी यावेळी म्हटलं आहे. पूरग्रस्त भागांची पाहणी केल्यानंतर गुहागर येेथील आरजीपीपीएल गेस्ट हाऊसमध्ये झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

यावेळी त्यांच्यासोबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार आशिष शेलार, आमदार शेखर निकम, विभागीय आयुक्त विकास पाटील, जिल्हाधिकारी बी. एन. पाटील, पोलिस अधिक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग आणि जि.प. सीईओ डॉ. इंदुराणी जाखड आदी उपस्थित होते.

शासनाने तातडीने मदत द्यावी - भगतसिंग कोश्यारी
राज्यपाल आज चिपळूण दौऱ्यावर आले असताना त्यांनी पुरग्रस्तांशी संवाद साधला. दरम्यान, त्यांनी लोकांना धीर देत सरकारकडून तातडीने मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे. महापूरमुळे नुकसानग्रस्त झालेल्या नागरिकांना आणि व्यापारांना मदत करणे गरजेचे आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडूनदेखील आवश्यक ती मदत दिली जाईल असे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी यावेळी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...