आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॅबिनेट बैठक:दरवर्षी मंत्रीमंडळाची एक बैठक रायगडावर घेण्याचे आदेश राज्यपालांनी द्यावेत-खा. संभाजीराजे

कोल्हापूरएका वर्षापूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक

दरवर्षी मंत्रीमंडळ कॅबिनेट ची एक बैठक रायगडावर घेण्याचे आदेश द्यावेत. अशी विनंती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ट्विटर द्वारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना केली. जेणेकरून छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या धेयवादाने रायगड वर राज्याभिषेक करवून घेतला, तो राजकारणी आणि अधिकाऱ्यांना लक्षात येईल स्वराज्याला सुराज्यात रूपांतरित करून प्रशासनासाठी उत्तम राज्यकारभार नेमका कसा करावा याची प्रेरणा मिळेल असेही संभाजीराजे यांनी म्हटले आहे.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी वयाच्या 79 वर्षी किल्ले शिवनेरी 'पायी' सर केला. ही आमच्या सारख्या गडप्रेमी शिवभक्तांसाठी समाधान देणारी गोष्ट आहे. त्यापेक्षाही पुढे जाऊन त्यांनी जे प्रत्येक मंत्र्याने एकेक किल्ला दत्तक घेण्याचे आवाहन केले त्याचे मी मनापासून स्वागत करतो असेही ट्विट संभाजीराजे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...