आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Grampanchayat Election Declared : 14 Thousand 234 Gram Panchayat Elections Announced In The State; Voting On January 15th

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निवडणुकीचा बिगुल वाजणार!:राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर; 15 जानेवारी रोजी मतदान

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या निवडणुकांसाठी आजपासून (11 डिसेंबर) आचारसंहिता लागू झाली आहे

राज्यातील 34 जिल्ह्यांतील सुमारे 14 हजार 234 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार असून 18 जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान या निवडणुकांसाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी केली.

एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपलेल्या 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते; परंतु कोविड-19 ची परिस्थिती उद्‌भवल्याने 17 मार्च 2020 रोजी हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता. त्यानंतर तो पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. यासह डिसेंबर 2020 अखेर मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित होणाऱ्या सर्व ग्रामपंचायतींसाठी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

असा असेल निवडणूक कार्यक्रम?

> 15 डिसेंबर तहसीलदार यांनी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील

> 23 ते 30 डिसेंबर नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा कालावधी

> 31 डिसेंबर उमेदवारी मागे घेण्याची मुदत आणि अर्जांची छाननी

> 4 जानेवारी उमेदवारांची अंतिम यादी

> 15 जानेवारी मतदान

> 18 जानेवारी मतमोजणी

निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या

ठाणे- 158, पालघर- 3, रायगड- 88, रत्नागिरी- 479, सिंधुदुर्ग- 70, नाशिक- 621, धुळे- 218, जळगाव- 783, अहमनगर- 767, नंदुरबार- 87, पुणे- 748, सोलापूर- 658, सातारा- 879, सांगली- 152, कोल्हापूर- 433, औरंगाबाद- 618, बीड- 129, नांदेड- 1015, उस्मानाबाद- 428, परभणी- 566, जालना- 475, लातूर- 408, हिंगोली- 495, अमरावती- 553, अकोला- 225, यवतमाळ- 980, वाशीम- 163, बुलडाणा- 527, नागपूर- 130, वर्धा- 50, चंद्रपूर- 629, भंडारा- 148, गोंदिया- 189 आणि गडचिरोली- 362. एकूण- 14,234.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser