आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनसेचा 'दे धक्का ':मनसेची विजयी दौड सुरू, 'या' ग्रामपंचायतींमध्ये उधळला गुलाल

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मनसेने चार जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक ग्रामपंचायत ताब्यात घेतली आहे

राज्यात आज 12,711 ग्रामपंचायत निवडणुकींची मतमोजणी सुरू आहे. अनेक ठिकाणी स्थानिक युत्या-आघाड्यांचे वर्चस्व कायम पाहायला मिळत आहे. या सगळ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही काही ठिकणी गुलाल उढळला आहे. ठाणे, बीड, बुलढाणा, अहमदनगर जिल्ह्यातील प्रत्येकी एक ग्रामपंचायत मनसेने काबीज केली आहे.

हाती आलेल्या निकालानुसार, अंबरनाथ तालुक्यातील काकोळी ग्रामपंचायतीवर मनसेने शिवसेना-भाजपा युतीला धूळ चारत आपला झेंडा फडकावला आहे. यात मनसेने 7 पैकी 4 जागा जिंकल्या आहेत. याशिवाय, बीड जिल्ह्यातील केजच्या नारेवाडी ग्रामपंचायतीवरही मनसेने झेंडा फडकावत सात पैकी पाच जागांवर विजय मिळवला आहे. तिकडे, अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीतील शिरसाठवाडी ग्रामपंचायतही मनसेच्या ताब्यात आली आहे. ग्रामपंचायतीमध्ये एकूण 9 जागा होत्या. या सर्व जागा मनसेच्या अविनाश पालवे पॅनेलने जिंकल्या आहेत. याशिवाय, बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील जिगाव ग्रामपंचायतीमध्ये मनसेचा मोठा विजय झाला आहे. पक्षाने 9 पैकी 7 जागांवर विजय मिळवला आहे.

बातम्या आणखी आहेत...