आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Gulabrao Patal On Uddhav Thackeray | Eknath Shinde Is Working CM, We Don't Care About Sambhaji Brigade Shiv Sena Alliance

गुलाबराव पाटलांची उद्धव ठाकरेंवर टीका:शिंदे काम करणारे मुख्यमंत्री, संभाजी ब्रिगेड-शिवसेना युतीची आम्हाला फिकीर नाही

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिंदे गट हाच शिवसेनेचा ओरिजनल गट आहे. काम करणाऱ्यांना अशा गोष्टींनी फरक पडत नाही. मुख्यमंत्री शिंदेंनी त्यांची प्रतिमा तशी बनवली आहे. त्यामुळे शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या युतीची आम्हाला कुठलीही फिकीर नाही, असे वक्ततव्य पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव येथे केले.

राज्याच्या राजकारणात दररोज नवनवीन गोष्ट घडत आहे. शुक्रवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्रित येणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड आगामी सर्व निवडणुकांमध्ये एकत्र लढवणार आहे. सोबतच ते एकत्रित मेळावे देखील घेणार आहेत. वेगवेगळ्या स्तरातून याबाबत प्रतिक्रीया उमटत आहे.

घोडामैदान दूर नाही

शिंदे गटातील नेते आणि राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, येणाऱ्या काळात नगरपरिषद, जिल्हा परिषदेच्या निवडणूका होऊ घातल्या आहेत. घोडामैदान आता जास्त दूर नाही. राजसाहेबांनी आपली तयारी सुरु केली आहे. भाजप तयारी करत आहे. उद्धव साहेबांच्या नेतृत्वात त्यांचे लोकं काम करत आहे. आगामी निवडणुकीत दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल तेव्हा कळेल, असे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

दोस्त यही दुवा करना

दोस्त यही जिंदगी की दुवा करना हम रहे अगर ना रहे मगर हमे याद रखना. अशी शेरोशायरी करत गुलाबाराव पाटलांनी आपल्या मित्रांना ती समर्पित केली. माणूस कितीही वरती गेला तरी गावात तो सर्वसाधारण माणूस असतो. तसेच आज मी सगळ्यांशी बोलण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगितले.

युतीने फरक पडत नाही

पुढे बोलतांना ते म्हणाले, विरोध करणे विरोधकांचे काम आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर आम्ही वेगवेगळे निर्णय घेत आहोत. शेतकऱ्यांसाठी, जेष्ठांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतले. त्यामुळे विरोधकांनी कितीही टीका केली तर शेवटी काम जो करतो जनता त्यालाच नमस्कार करते. एकनाथ शिंदे हे काम करणारे मुख्यमंत्री असून कोणत्याही युतीने त्यांना फरक पडत नाही.

बातम्या आणखी आहेत...