आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घणाघात:'नारायण राणे एक सुशिक्षित बेरोजगार राजकारणी आहेत'; शिवसेना नेते गुलाबराव पाटलांचा घणाघात

जळगावएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

'नारायण राणे यांना काहीच काम धंदा उरला नाही, ते एक सुशिक्षित बेरोजगार राजकारणी आहेत,' असा खोचक टोला शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी नारायण राणेंना लगावला. नारायण राणे यांनी नाणार प्रकल्पावरुन शिवसेनेवर केलेल्या टीकेला गुलाबराव पाटलांनी उत्तर दिले.

यादरम्यान पाटील म्हणाले की, 'नारायण राणे हे सुशिक्षित बेरोजगार राजकारणी आहेत. त्यांना काहीही कामधंदा उरलेला नाही. ते घरी एक बोलतात आणि बाहेर दुसरच बोलतात. राणे मुख्यमंत्री असताना कोकणात कोणताही नवीन प्रकल्प आणू शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी बाकीच्या गोष्टींवर काहीच बोलू नये. अशी वक्तव्ये करुन त्यांना स्वतःची प्रसिद्धी करायची आहे,' असा चिमटा देखील गुलाबराव पाटलांनी यावेळी काढला.

काय म्हणाले होते नारायण राणे?

'नाणार प्रकल्पाला काही स्थानिकांनी दोन दिवसांपूर्वी समर्थन दिले. त्यात 80 टक्के शिवसैनिक होते. पैसे कमावणे हा एकच शिवसेनेचा धंदा आहे. पूर्वी विरोध केला आणि आता समर्थन करत आहेत. हे शिवसेनेचे घुमजाव आहेत. ही स्थानिक जनतेची फसवणूक आहे,' असा घणाघाती आरोप नारायण राणेंनी केला होता.

बातम्या आणखी आहेत...