आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्राईम:हिंगोली शहरात तलाब कट्टा भागातून पाच लाख रुपयांचा गुटखा पकडला, आरोपी फरार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली शहरातील तलाब कट्टा भागात सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या पथकाने रविवारी ता. ११ रात्री १० वाजता एका घरावर छापा टाकून पाच लाख रुपयांचा गुटखा पकडला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

हिंगोली शहरातील तलाब कट्टा भागात एका घरामध्ये प्रतिबंधित गुटखा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस अधिक्षक यतिश देशमुख हिंगोली शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक पंडित कच्छवे, उपनिरीक्षक गंगाधर बनसोडे, जमादार एस. पी. जाधव, जी. व्हि. सोनटक्के, आसेगांवकर, दांडेगावकर, ब्रम्हा अंभोरे, महिला पोलिस कर्मचारी परविन शहा यांच्यासह कर्मचाऱ्यांनी रात्री दहा वाजता एका घरावर छापा टाकला.

यामध्ये घरात गुटख्याची बारा पोते आढळून आली. पोलिसांनी सदरील गुटख्याची पोती जप्त करून हिंगोली शहर पोलिस ठाण्यामध्ये आणली आहे. पोलिसांचा छापा पडल्याची माहिती मिळताच आरोपी पसार झाला. या गुटख्याची किंमत पाच लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

बातम्या आणखी आहेत...