आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात पाऊस:मुंबई, कोकणात पावसाची दमदार हजेरी दाणादाण, कोकणात अनेक नद्यांना पूर

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
अतिवृष्टीमुळे मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील सुरक्षा चौकीसह गार्डन गेट समोरील वाहनांवर झाडे उन्मळून पडली - Divya Marathi
अतिवृष्टीमुळे मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावरील सुरक्षा चौकीसह गार्डन गेट समोरील वाहनांवर झाडे उन्मळून पडली

मुंबई शहरासह उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यालाही पावसाने झोडपून काढले आहे. याशिवाय कोकणातही मुसळधार पाऊस सुरुच आहे. पावसामुळे काही सखल भागात पाणी साचले आहे. दादर, हिंदमाता भागात तळे साठलेले दिसत आहेत. अनेक ठिकाणी लोकल वाहतूक बंद झाली आहे.

वसई विरार नालासोपाऱ्यात रात्रभर जोरदार पाऊस सुरु आहे. शहरातील सखल भागातील मुख्य रस्ते जलमय झाले असून, रस्त्यांना नदीचे स्वरुप आले आहे. नालासोपारा पूर्व सेंट्रल पार्क, नागीनदास पाडा, तुलिंज, आचोले, विरार पूर्व चंदनसार, पश्चिम विवा कॉलेज रोड, एम बी इस्टेट, वसई पश्चिम समता नगर, पार्वती क्रॉस रोड, सागरशेत, वसई पूर्व नवजीवन, सातीवली परिसरातील मुख्य रस्ते जलमय झाले आहेत. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे विजेचाही लपंडाव सुरु आहे. पावसाचा जोर अजूनही कायम आहे.

कोकणात पावसामुळे जनजीवन विस्कळीत

तिकडे कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातही पावसाने दमदार हजेरी लावली आहे. नद्यांची पाणी पातळी वाढली असून काही अनेक ठिकाणी पाणी शिरले आहे. कोकणात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला आहे. या पुराचा फटका गणोशोत्सवानिमित्ताने कोकणात जाणाऱ्यांना चाकरमान्यांना बसत आहे. माणगाव शहराजवळ घोड नदीचे पाणी कळमजे या पुलावरुन वाहू लागल्याने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अनेक नद्यांना पूर आला आहे.

बातम्या आणखी आहेत...