आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हसन मुश्रीफांचा पलटवार:सोमय्यांनी केलेले आरोप पूर्पपणे चुकीचे, किरीट सोमय्यांविरोधात दोन आठवड्यात 100 कोटींचा दावा ठोकणार-हसन मुश्रीफ

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राष्ट्रवादीचे नेते आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबाने 127 कोटींचा घोटाळा केला असून, त्याबाबत 2700 पानांचा पुरावा इन्कम टॅक्सला दिल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. सोमय्यांचा मनी लॉड्रिंगचा गंभीर आरोप मुश्रीफांवर केल्यानंतर हसन मुश्रीफ यांनी तातडीची पत्रकार परिषद घेतली.

सोमय्यांवर 100 कोटींचा दावा ठोकणार - मुश्रीफ
येत्या 2 आठवड्यांत किरीट सोमय्यांवर फौजदारी अब्रू नुकसानीचा 100 कोटींचा दावा कोल्हापूरच्या सत्र न्यायालयात करत आहे. जेव्हा ते तारखेला येतील, तेव्हा त्यांनी माहिती घ्यावी. मग त्यांच्या लक्षात येईल की भाजपा कोल्हापूरमधून सपाट झाला आहे. पुढील 10 वर्ष देखील भाजपाला स्थान नाही. चंद्रकांत पाटील यांनी देखील हायब्रिड ऑन्युइटी बांधकामात जो भ्रष्टाचार केला आहे त्यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन भ्रष्टाचार विरोधी पथकाकडे तक्रार करणार आहे”, असं देखील हसन मुश्रीफ म्हणाले.

मुश्रीफांना सोमय्यांचा टोला
विनाकारण भाजपची प्रतिमा मलीन होईल, असे वक्तव्य किरीट सोमय्यांनी करू नये. राष्ट्रीय तपास संस्थांच्या अशा कारवायांमुळे फार चीड येते. येणाऱ्या भाजपच्या पराभवाला किरीट सोमय्या जबाबदार राहतील. जेव्हा महाविकास आघाडी सत्तेत येईल, तेव्हा मी किरीट सोमय्याला हार घालेन असे म्हणत त्यांनी सोमय्यांना टोला लगावला.

बातम्या आणखी आहेत...