आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रांतिपर्वाची अखेर:क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या क्रांतिवीरांगना हौसाताई पाटील यांचे निधन, वयाच्या 96 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

सातारा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रतीसरकार संस्थापक क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या कन्या क्रांतिविरांगना हौसाक्का पाटील यांचे (९६) प्रदिर्घ आजाराने कराड येथे रुग्णालयात उपचार सुरू असताना दु:खद निधन झाले. कराड येथील कृष्णा हॉस्पिटल मधील कोविड सेंटरमधे उपचार चालू होते. हौसाक्कांच्या दोन्ही टेस्ट निगेटीव्ह होत्या. परंतु एच.आर. सी.टी. स्कोअर ९ होता. त्यामुळे उपचार कोविड सेंटरला सुरु होते. हौसाक्का यांचे अंत्यसंस्कार शासकीय नियमानेच होणार आहेत.

क्रांतिपर्वातील शेवटचा दुवा निखळला आहे. हौसाक्कांच्या जाण्याने प्रतिसरकार चळवळीत, स्वातंत्र्य आंदोलनात महिलांच्या मधून योगदान देणारा दिपस्तंभ हरपला. सांगली जिल्ह्यातील हणमंतवडिये येथे त्या वास्तव्यास होत्या. हौसाक्कांना प्रा. विलास पाटील एडवोकेट सुभाष व स्मृतीशेष अजित पाटील अशी तीन मुले व विवाहित मुलगी शकुंतला. औसा काकांचे पती माजी आमदार क्रांतिवीर भगवानराव पाटील उर्फ बप्पा हे खानापूर तालुक्यातून १९५७ ते ६२ या कालावधीत संयुक्त महाराष्ट्र समितीच्या वतीने विधानसभेवर निवडून आले होते. हौसाक्का या अगदी अलीकडच्या काळापर्यंत विविध कार्यक्रमातून दिसायच्या.

बातम्या आणखी आहेत...