आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Health Department Exam । Maharashtra । Confusion Again At Health Department Examination Centers, 10 Minutes Delay In Question Papers In Many Places

विद्यार्थी संतप्त:आरोग्य विभागाच्या परिक्षा केंद्रांवर पुन्हा गोंधळ, अनेक ठिकाणी प्रश्नपत्रिकेस 10 मिनीटे उशीर; आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडून स्पष्टीकरण

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आरोग्य विभागाच्या परिक्षेचा गोंधळ सुरुच आहे. आज पुन्हा नाशिक आणि पुणे येथील केंद्रांवर परिक्षेचा गोंधळ पाहायला मिळाला. त्यावर आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपले स्पष्टीकरण दिले आहे. पुणे येथे विद्यार्थ्यांना दहा मिनिटे उशिराने पेपर मिळाल्याची कबुली टोपे यांनी केली. दहा मिनिटे उशीर झालेला वेळ भरून काढण्य़ात येईल, अशी ग्वाही देखील आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.

प्रश्नपत्रिकेच्या बॉक्सवरील डिजीटल लॉक वेळेवर न उघडल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका देण्यास उशीर झाला असून, पुण्यातील अनेक केंद्रांवर प्रश्नपत्रिकेसाठी विद्यार्थ्यांना पाच ते दहा मिनिटे वाट पाहावी लागली. तर नाशिकमध्ये अनेक परिक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांच्या तुलनेतस कमी प्रश्नपत्रिका असल्याचे उघड झाले. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आरोग्य विभागाच्या सुरुवातीच्या परिक्षेपासून गोंधळ उडतांना पाहायला मिळत आहे. आज पुन्हा प्रश्नपत्रिकेला वेळ झाल्याने विद्यार्थ्यांना वेळ वाढवून देण्यात येणार आहे. तसेच संबंधित परिक्षा घेणारी न्यासा या कंपनीवर देखील कारवाई केली जाईल. असे आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. संजोग कदम यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आरोग्य विभागाच्या परिक्षेच्या सुरुवातीपासूनच गोंधळ सुरु आहे. राज्य सरकारने परिक्षा एमपीएससीमार्फत घ्यावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र तरी देखील राज्य सरकारने गांभीर्य घेतले नसुन, आज पुन्हा परिक्षा केंद्रांवर न्यासा या परिक्षा घेणाऱ्या कंपनीचा अनेक केंद्रांवर गोंधळ पाहायला मिळाला.

बातम्या आणखी आहेत...