आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरोग्यमंत्र्यांचे पत्र:'एकजुटीने, एकमताने, एकनिर्धाराने कोरोनाला हरवुया'; आरोग्यमंत्री राजेश टोपेंचे पत्र

मुंबई11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'समजदार, संवेदनशील व सहकार्य करणारे लोक ही आपल्या राज्याची ओळख'

सध्या राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक सुरू झाला आहे. अनेक राज्यात शेकडोंच्या संख्येने कोरोना रुग्ण सापडत आहेत. यातच आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला कोरोनासंबंधी जागरुक करण्यासाठी एक पत्र लिहिले आहे.

आरोग्यमंत्र्यांनी आपल्याप त्रात म्हटले आहे की, 'गेल्या वर्षभरापासून आपण कोरोना विरुद्धची लढाई लढत आहोत. शासनाची खंबीर भूमिका, ठोस उपाययोजना व प्रामाणिक प्रयत्न, जीवाची पर्व न करता लढणारे अनेक कोरोना योद्धे, डॉक्टर, नर्सेस, आरोग्यसेवक, पोलिस, स्वच्छता कामगार यांच्यामुळे आपण कोरोना नियंत्रित करू शकलो. मात्र, अद्यापही कोरोना गेलेला नाही. तो पुन्हा डोके वर काढत आहे. तेव्हा पुन्हा एकदका सामूहिक लढाई लढावी लागणार आहे,' असे आवाहन टोपे यांनी केले.

लवकरच या लढाईत मी सहभागी होईन...

टोपे पुढे म्हणतात की, 'मी सध्या हॉस्पिटलमध्ये कोरोनाविरुद्ध लढतो आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणू माझा पाठलाग करत होता. राज्यातील अनेक भागात गेलो. कोरोनो हॉटस्पॉटला भेटी दिल्या. परंतु, कोरोनाला माझ्या जवळ येणे जमले नाही. पण अखेर त्यांने गाठलेच. राज्यातील जनतेच्या सदभावना, प्रेम यामुळे त्याला हवून मी पुन्हा एकदा कोरोना विरुद्धच्या सामूहिक लढाईत सहभागी होणार आहे', असे टोपे म्हणाले.

नियम पाळा आणि लॉकडाऊन टाळा

आरोग्यमंत्र्यांनी पत्रात पुढे लिहीले की, 'समजदार, संवेदनशील व सहकार्य करणारे लोक ही आपल्या राज्याची ओळख आहे. म्हणूनच लॉकडाऊन काळात सर्व जनतेने कोरोना संकटाचा सामना अत्यंत संयमाने केलेला आपण पाहिला. मात्र, आता पुन्हा लॉकडाऊन परवडणार नाही. लॉकडाऊन टळणे केवळ आणि केवळ आपल्याच हातात आहे. मास्क सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर पाळा व लॉकडाऊन टाळा. स्वतःची काळजी म्हणजे कुटुंबातील प्रिय व्यक्तींची आणि समाजाची काळजी आहे. चला एकजुटीने, एकमताने, एकनिर्धाराने कोरोनाला हरवुया', असे आवाहन राजेश टोपेंनी आपल्या पत्रातून केले आहे.

बातम्या आणखी आहेत...