आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआधी तू घे मग मी घेतो अशी मानसिकता आरोग्य कर्मचार्यांमध्ये दिसत आहे. मात्र त्यांचे समुपदेशन, आयईसी केले जात आहे. छोटे व्हिडीओ रेकॉर्ड करून सगळ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना पाठवले जात आहे. दोन्ही व्हॅक्सीन सुरक्षित आणि वैज्ञानिकांनी खात्री दिली असल्याने व्हॅक्सीनेशन कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य कर्मचार्यांना केले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे हे आज राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात जनता दरबार उपक्रमासाठी आले असता माध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधला.
राज्यात आतापर्यंत ५४ टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. मुळात स्लो पध्दतीने अॅप चालत आहे. दुसरी गोष्ट लोकांना डबल डबल नांवे जात आहेत. सगळ्या गोष्टीमुळे लोकांच्या मनात कन्फ्युजन असते. ते दुरुस्त करण्याचे काम केंद्रस्तरावर सुरू आहे. केंद्राच्या या गोष्टी वारंवार निदर्शनास आणून दिल्या आहेत. त्यामुळे त्यात सुधारणा होईल असेही राजेश टोपे यांनी सांगितले.
दरम्यान व्हॅक्सीनबाबत चुकीचे विधान माध्यमातून जाऊ नये आणि कन्फ्युजन होऊ नये याची काळजी माध्यमांनी घ्यावी असे आवाहनही राजेश टोपे यांनी माध्यमांना केले आहे.
महाराष्ट्र पहिल्या दिवशी ६५ टक्के होते. देशात पहिल्या दोन - तीनमध्ये महाराष्ट्र आहे. ५४ टक्के लसीकरण झाले हे काही कमी नाही. टक्केवारीवर जाण्यात अर्थ नाही. व्हॅक्सीनेशन होत आहे. आपल्याकडे कशाचीही कमतरता नाही. आम्ही या सगळ्याला सज्ज आहोत. छोट्या छोट्या उणीवा आहेत त्या दुरुस्त केल्या जात आहेत. अॉफलाईन व्हॅक्सीनेशन करण्यावर भर देतोय. प्रत्येक सेंटरला रोज १०० व्हॅक्सीनेशन व्हावे असे आदेश दिलेले आहेत. शक्यतो अॅप व्यवस्थित दुरुस्त झाला तर याला गती येईल असेही राजेश टोपे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.