आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Heat Wave In The State Till May 30: Vidarbha, Marathwada Become Hotspots; Temperature Will Increase By 3 To 4 Degrees

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सूर्य तळपला:राज्यात 30 मेपर्यंत उष्णतेची लाट : विदर्भ, मराठवाडा बनले हॉटस्पॉट; 3 ते 4 अंश वाढ होणार

औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अरबी समुद्रात ३१ मेपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र

राज्यात येत्या ३० मेपर्यंत उष्णतेची लाट कायम राहील, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या काळात विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान सरासरीपेक्षा ३ ते ४ अंशांनी जास्त राहील. सध्या विदर्भ आणि मराठवाडा हॉटस्पॉट बनले आहे. चंद्रपूर येथे राज्यातील सर्वाधिक ४६.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. शुक्रवारपर्यंत दक्षिण अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

पुणे वेधशाळेनुसार, बुधवारी विदर्भात बहुतांश ठिकाणी, तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती. राज्यातील बहुतांश ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. मध्य महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यात ३० मेपर्यंत लाट राहण्याची शक्यता आहे.

अरबी समुद्रात ३१ मेपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र

अरबी समुद्रात केरळजवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत आहे. सध्या तेथे समुद्रसपाटीपासून ६ किमी उंचीवर चक्राकार वारे वाहत आहे. २९ मेपासून तेथे कमी दाब निर्माण होऊन ३१ मेपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. याचा मान्सूनवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.

चंद्रपूर नव्हे, सूर्यपूर @ 46.4 अंश

बुधवारी चंद्रपूर येथे राज्यातील सर्वाधिक ४६.४ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतेक शहरांत पारा चाळिशीपार होता.

प्रमुख शहरांतील तापमान :

औरंगाबाद ४१.७, नगर ४२.६, अकोला ४४.६, चंद्रपूर ४६.४, अमरावती ४५, नागपूर ४६, सोलापूर ४१.४, जळगाव ४३, उस्मानाबाद ४१.४, परभणी ४४, मालेगाव ४३.६ अंश सेल्सियस.

बातम्या आणखी आहेत...