आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायेत्या तीन ते चार दिवसात महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर वेगानं वारे वाहतील. तसेच राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो असा, अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
बंगालच्या उपसगारात हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र आज तीव्र निर्माण झाले आहे. त्यामुळे येत्या 24 तासात ते आणखी तीव्र होणअयाची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. तसेच ते आतल्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम होऊन पश्चिम किनारपट्टीवर पुढचे तीन ते चार दिवस वेगवान वारे वाहतील, असा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामानतज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी यासंदर्भात टविट केले आहे.
कोकणातील जिल्ह्यांचा याचा सर्वाधिक धोका असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे कोकणात आणि किनारपट्टी परिसरात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने आजसाठी रायगड, रत्नागिरी, सातारा, पुणे, कोल्हापूर, पालघरला ऑरेंज अलर्ट दिला आहे.
ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, वाशिम, गोंदिया, गडचिरोली, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदियाला यलो अलर्ट दिला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.