आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Heavy Rains In Beed Nanded Hingoli District; One Woman Killed And Three Others Were Seriously Injured In A Lightning Strike

अवकाळीचा कहर:बीड-नांदेड-हिंगोली जिल्ह्यांत जोरदार पाऊस; वीज पडून एक महिला ठार, तर तीन गंभीर जखमी

बीड/ नांदेड/ हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बुलडाणा जिल्ह्यात पाऊस, तर काही भागात गारपीट

मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस बरसत असल्याने माेठे नुकसान हाेत अाहे. रविवारी नांदेड, बीड, हिंगाेली जिल्ह्यात माेठे नुकसान झाले. मुदखेड तालुक्यातील मुगट येथील चार महिला शेतात ज्वारी कापणीचे काम करत होत्या. या वेळी वीज पडून एक महिला जागीच ठार, तर तीन महिला गंभीर जखमी झाल्या.

लक्ष्मी वर्षेवार (२५) असे मृत महिलेचे नाव आहे.मुदखेड तालुक्यातील मुगट येथे रविवारी सकाळच्या दरम्यान लक्ष्मी वर्षेवार या मुदखेड रेल्वेस्टेशनजवळील आपल्याच शेतात इंदुबाई लोखंडे (४०), रेणुका व्यंकटी वर्षेवार (२९), अर्चना दिलीप मेटकर (२८) या तिघींना घेऊन ज्वारी कापणीचे काम करत होत्या. त्या वेळी सकाळी अचानकपणे विजेच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस सुरू झाला. या वेळी सदरील महिलांनी लिंबाच्या झाडाखाली आसरा घेतला असताना अचानक अंगावर वीज कोसळली. लक्ष्मी बालाजी वर्षेवार (२५) या जागीच ठार झाल्या, तर सोबतच्या तीन महिला गंभीर जखमी झाल्या. तिघींनाही मुदखेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

धारूर, पाटाेदा, परळी तालुक्यात जाेरदार पाऊस

जिल्ह्यामध्ये रविवारी दुपारी जिल्ह्यातील किल्ले धारुर तालुक्यामध्ये दाेन तास मुळधार पाऊस झाला. परिणामी शेतकऱ्यांच्या पिकांचे पूर्णत: नुकसान झाले तर काही शेतांमध्ये पाणी साचल्याने तळे निर्माण झाले. दाेन तास झालेल्या पावसामुळे तालुक्यातील नदी- नाल्यांना पुर अाला हाेता. तसेच पाटाेदा तालुक्यातही रविवारी दुपारी एक तास वादळी वाऱ्यासहज जाेरदार पाऊस झाला. परळी तालुक्यातील सिरसाळा व इतर गावांमध्ये दुपारी पावसाने हजेरी लावली. केज तालुक्यात लाडेवडगाव आणि मोटेगावमध्येवीज पडल्याने एक गाय व म्हैस ठार झाली.{हिंगोली शहरासह जिल्हाभरात रविवारी ९ पहाटेपासून पाऊस सुरू आहे. सेनगाव तालुक्यातील आजेगाव परिसरामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक घरावरची तीन पत्रे उडून गेली आहेत . तसेच मोठ्या प्रमाणात गारपीटही झाली आहे.

तिकडे औरंगाबाद जिल्ह्यात सायंकाळी काही वेळ पावसाने हजेरी लावली. अनेक भागातील वीज गुल झाली होती. परभणी जिल्ह्यातही दिवसभर ढगाळ वातावरण होते. पावसामुळे ठिकठिकाणी पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे कृषी विभागातील सूत्रांनी सांगितले.

अनेक घरांवरील टीनपत्रे उडून गेले

देगलूर तालुक्यातील करडखेडवाडी, बोरगाव कावळगाव, केदारकुंठा, सांगवी, आमदापूर, दरेगाव परिसरात रविवारी दुपारी २ वाजता विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळी वाऱ्याने अनेक घरांवरील टीनपत्रे उडून गेले. केज शहर व तालुक्यात रविवारी दुपारी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसात लाडेवडगाव आणि मोटेगाव या दोन गावांत वीज पडल्याने एक गाय व म्हैस ठार झाली. दुपारी जिल्ह्यातील किल्लेधारूर, पाटाेदा तालुक्यातही मुसळधार पाऊस झाला.

यवतमाळ जिल्ह्यात विजांच्या कडकडाटात पावसाची हजेरी
जिल्ह्यात चार ते पाच दिवसांपासून पावसाळी वातावरण असून रविवारी पहाटेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह तीन तास पाऊस झाला. दिवसभर ढगाळ वातावरण होते. जिल्हाभरात मध्यरात्रीपासूनच तुरळक ठिकाणी पाऊस पडला.

अकाेला जिल्ह्यात पातूर, बाळापूर तालुक्यांत पाऊस
जिल्ह्यातील पातूर व बाळापूर तालुक्यांत रविवारी सायंकाळी मेघगर्जनेसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात सकाळी तापमान वाढलेले होते, तर दुपारनंतर ढगाळ वातावरण होते.

अमरावती जिल्ह्यात मेघगर्जनेसह वादळी पाऊस
जिल्ह्यात शनिवारी मध्यरात्री मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडला. अमरावती, तिवसा, भातकुली, नांदगाव खंडेश्वर, अचलपूर, दर्यापूर या तालुक्यात काही ठिकाणी तुरळक, तर काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. बहुतांश घरावरील पत्रे व शेतीमालाचे नुकसान झाले.

बुलडाणा जिल्ह्यात पाऊस, तर काही भागात गारपीट
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे उकाडा वाढला असून काही भागात रविवारी दुपारनंतर मलकापूर पांग्रा येथे गारपिटीसह पाऊस पडला आहे.

मुदखेड तालुक्यात वीज पडून महिला ठार, धारूरमध्ये पूर
नदीला आला पावसाळ्यासारखा पूर : किल्लेधारूर तालुक्यात पावसामुळे जागीरमोहा, सोनीमोहा येथील सोनी नदी तुडुंब भरून वाहिली. पुलावरून पाणी वाहिल्यामुळे दीड तास वाहतूक बंद होती. चोरंबा येथील लेंडी नदीला पूर आला होता.

बातम्या आणखी आहेत...