आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

न्यायालयाची परवानगी:वरवरा राव यांना उच्च न्यायालयाचा दिलासा, उपचारासाठी नानावटी रुग्णालयात दाखल करण्याची परवानगी

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एल्गार परिषदेच्या माध्यमातून कोरेगाव भीमा येथील हिंसाचारास कारणीभूत असल्याच्या आरोपात अटकेत असलेले प्रसिद्ध कवी वरवरा राव यांना बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. तळोजा कारागृहात असलेल्या राव यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली आहे. त्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी राव यांच्या पत्नी हेमलता यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर न्यायालयाने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्याची परवानगी दिली आहे. यानुसार वरवरा राव यांना 15 दिवसांसाठी मुंबईच्या नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.

भीमा-कोरेगाव दंगलीप्रकरणी 2018 पासून तुरुंगात असलेल्या वरवरा राव यांना तुरुंगात योग्य उपचार मिळत नसल्याचे कारण देत पत्नी हेमलता यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. कारागृहात राव यांना करोनाची लागण झाल्यामुळे त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. वरिष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी राव यांच्या पत्नी हेमलता यांची बाजू कोर्टात मांडली. राव हे गेल्या काही महिन्यांपासून अंथरुणावर खिळून आहेत. तसेच त्यांना लिव्हरचा त्रासही होत आहे. यावर योग्यवेळेत उपचार न झाल्यास त्यांचा जीव जावू शकतो आणि ही कस्टोडीअल डेथची केस बनेल असा युक्तीवाद जयसिंग यांनी केला. यावर निकाल देताना मुंबई उच्च न्यायालयाने राव यांना नानावटी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...