आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरण:अर्णब गोस्वामी यांना जामीन देण्यास हायकोर्टाचा नकार

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना मुंबई उच्च न्यायालयाने दणका दिला आहे. न्यायालयाने अर्णब यांच्यासह नितीश सारडा आणि फिरोज शेख यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला आहे. नियमाप्रमाणे जामिनासाठी आधी सत्र न्यायालयात याचिका करावी असे निर्देश उच्च न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना दिले आहेत.

आरोपी जेव्हा न्यायालयीन कोठडीत असतो तेव्हा उच्च न्यायालय त्यात हस्तक्षेप करुन ती अटक बेकायदेशीर ठरवून त्याला जामीन देऊ शकत नाही, असा युक्तिवाद राज्य सरकारच्या वतीने वकिलांनी मांडला. हा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायमूर्ती एस एस शिंदे आणि मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठाने निकाल दिला. यानुसार, आता अर्णब गोस्वामी आणि इतर दोन आरोपींनी जामिनासाठी अलिबाग सत्र न्यायालयात अर्ज करावा. नियमानुसार त्या कोर्टातून मग हायकोर्टाचा पर्याय त्यांच्यासाठी खुला राहिल, असे निर्देश हायकोर्टाने दिले.

बातम्या आणखी आहेत...