आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगणघाट जळीतकांड प्रकरण:न्यायालयीन कामकाज पूर्ण होऊ न शकल्याने जळीतकांड प्रकरणाची अंतिम सुनावणी पुढील आठवड्यात, 5 फेब्रुवारीला लागणार होता निकाल

प्रतिनिधी । वर्धा3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुलराणी जळीतकांड प्रकरणाचा अंतीम निर्णय दिनांक 5 फेब्रुवारी रोजी हिंगणघाट न्यायालयात होणार होता. मात्र न्यायालयीन कामकाज पूर्ण होऊ न शकल्याने, या प्रकरणातील आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी पुढील आठवड्यात अंतिम निर्णय देण्यात येणार आहे. या प्रकरणाचा खटला हिंगणघाट येथील न्यायालयात सुरू असून पुढील सुनावणीची तारीख 5 फेब्रुवारी रोजी न्यायाधीश ठरवून देणार असल्याची माहिती सरकारी वकील दीपक वैद्य यांनी दिव्य मराठीला दिली आहे.

अनेकांना होती उद्याची आशा

फुलराणीला न्याय मिळणार अशा अपेक्षेने सर्वांचे लक्ष या सुनावणीकडे होते. 5 फेब्रुवारीलाच ही सुनावणी होणार अशी लोकांना आशा होती. परंतु, अंतिम सुनावणी पुढील आठवड्यात होणार आहे.

याचदरम्यान 5 फेब्रुवारीच्या संभावित सुनावणीसाठी सर्वांनी एकवटून गर्दी करावी असे पत्रक काढण्यात आले होते. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या पत्राच्या विरोधात पोलिसांनी कायदेशीर कारवाई केली आहे. अशी माहिती पोलिस निरीक्षक संपत चव्हाण यांनी दिली.

नेमके काय होते प्रकरण?

हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील प्राध्यापिका तरुणीला हिंगणघाट येथील नंदोरी चौकात दिनांक 3 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळच्या सुमारास पेट्रोल टाकून जिवंत जाळण्यात आले होते. त्या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली होती. दिनांक 28 फेब्रुवारी 2020 रोजी पोलिस निरीक्षक सत्यविर बंडीवार यांनी 426 पानांचे दोषारोप पत्र हिंगणघाट न्यायालयात सादर करण्यात आले, त्यानंतर दिनांक 14 डिसेंबर 2020 पासून या निवाड्याला सुरुवात झाली.

बातम्या आणखी आहेत...