आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगणघाट जळीतकांड प्रकरण:732 दिवसानंतर फुलराणीच्या कुटुंबीयांना मिळणार न्याय, प्रकरणाचा अंतिम निकाल 5 फेब्रुवारी रोजी

प्रतिनिधी । वर्धा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुलराणी जळीतकांड प्रकरणाचा युक्तिवाद दिनांक 21 जानेवारी रोजी पूर्ण करण्यात आला आहे. अंतिम निर्णय येत्या 5 फेब्रुवारी रोजी देण्यात येणार असल्याने, प्राध्यापिका तरुणीच्या कुटुंबियांना न्याय मिळणार असून, हिंगणघाट न्यायालयात विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची उपस्थित राहणार आहे.​​​

काय होते नेमके प्रकरण?

हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील प्राध्यापिका तरुणीला हिंगणघाट येथील नंदोरी चौकात दिनांक 3 फेब्रुवारी 2020 रोजी सकाळच्या सुमारास पेट्रोल टाकून जिवंत जाळण्यात आले होते. त्या प्रकरणात आरोपीला अटक करण्यात आली होती. दिनांक 28 फेब्रुवारी 2020 रोजी पोलिस निरीक्षक सत्यविर बंडीवार यांनी 426 पानांचे दोषारोप पत्र हिंगणघाट न्यायालयात सादर करण्यात आले, त्यानंतर दिनांक 14 डिसेंबर 2020 पासून या निवाड्याला सुरुवात झाली.

732 दिवसानंतर तिच्या कुटुंबियांना न्याय मिळणार!

दोन वर्षांच्या कालावधीत विधिज्ञ उज्ज्वल निकम व आरोपीचे वकील भुपेंद्र सोने यांच्यात युक्तिवाद झाला तर दिनांक 1 डिसेंबर 2021 रोजी फुलराणी जळीतकांड प्रकरण अंतिम टप्प्यात येऊन पोहचले. दिनांक 15 जानेवारी 2022 रोजी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद होणार होता, मात्र विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची प्रकृती ठीक नसल्याने दिनांक 21 जानेवारी रोजी युक्तिवाद पूर्ण करण्यात आला.

फुलराणी जळीतकांड प्रकरणाला दोन वर्षे पूर्ण झाली असून, 732 दिवसानंतर तिच्या कुटुंबियांना न्याय मिळणार आहे. या प्रकरणाचा युक्तिवाद पूर्ण झाला असून, अंतिम निकाल दिनांक 5 फेब्रुवारी रोजी हिंगणघाट येथील सत्र न्यायाधीश १ राहुल भागवत यांच्या न्यायालयात होणार असून, विधिज्ञ उज्ज्वल निकम उपस्थित राहणार आहेत. पोलिसांचा तगडा बंदोबस्त राहणार असल्याची माहिती शासकीय अभियोक्ता दीपक वैद्य यांनी दिव्य मराठीला दिली.

बातम्या आणखी आहेत...