आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगणघाट जळीत कांड:फुलराणी जळीतकांड प्रकरणाची सुनावणी 11 ,12 व 13 जानेवारीला; विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची राहणार उपस्थिती

वर्धा7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या सुनावणीदरम्यान साक्षीदारांची साक्ष घेतली जाईल

फुलराणी जळीत हत्याकांडामधील आरोपीला शिक्षा व्हावी याकरिता घटनास्थळी असलेल्या साक्षीदारांना न्यायालयात हजर राहावे याकरिता नोटीस पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, 12,12 व 13 जानेवारी रोजी विधिज्ञ उज्ज्वल निकम यांच्या सामोर साक्ष घेतली जाणार आहेत.

17 डिसेंबर रोजी न्यायालयाने फुलराणीला जिवंत जाळण्यात आले त्यावेळी घटनास्थळी असलेल्या साक्षीदारांची साक्ष महत्वाची असल्यामुळे सर्व साक्षदारांना न्यायालयात हजर राहण्याकरिता नोटीस पाठविण्याची प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. प्राध्यापिका तरुणीला जिवंत जाळण्याच्या गुन्ह्यात असलेला आरोपी विकेश उर्फ विक्की नगराळे याला दिनांक 14 डिसेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता,आरोपीचे वकील गैरहजर असल्यामुळे कामकाज थांबविण्यात आले होते. न्यायालयाच्या कामकाजाकरिता विधिज्ञ उज्ज्वल निकम यांनी उपस्थिती लावली होती. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी जानेवारी महिन्यात होणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे आता येत्या 11,12 व 13 जानेवारी रोजी साक्षीदारांची साक्ष नोंदविली जाणार आहे.

न्यायाधीशांनी केली आरोपीला विचारणा ;आरोपीने सुचविले वकील सोनेंचे नाव

जळीत हत्याकांडामधील आरोपीला 17 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता कडेकोट बंदोबस्तात न्यायालयात न्यायाधीशांसामोर हजर केले असता, न्यायाधीशांनी आरोपीला कोणता वकील हवा अशी विचारणा केली. त्यावेळी आरोपीने भुपेंद्र सोने यांचे नाव सुचविले. न्यायाधीशांनी भुपेंद्र सोने या वकीलाला न्यायालयात राहण्याची मंजुरी दिली. आरोपीचे वकीलपत्र स्वीकारण्यासाठी तीन वकील आले होते, त्यामध्ये नागपूर, वरोरा व हिंगणघाट या तिघांनी वकीलपत्र न्यायालयात सादर केले होते. त्यामध्ये न्यायालयाने भुपेंद्र सोने यांना आरोपीचे वकीलपत्र घेण्यासाठी मंजुरी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...