आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Hinglaj Mata Parbhani । Balochistan Pakistan । A Replica Of Hingulambika Mata Temple Has Been Erected In Parbhani

परभणीत बलुचिस्तानमधील हिंगलाज मातेची प्रतिकृती:कोरोनाचे संकट हद्दपार व्हावे यासाठी भाविकांनी नऊ दिवस शेकडो नंदादीप अखंडपणे ठेवले प्रज्वलित

परभणी6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी येथे देवीच्या 51 शक्तीपीठांपैकी एक शक्तिपीठ असलेल्या हिंगुलांबीका (हिंगलाज माता) देवीच्या प्रतिकृतीचे भव्य मंदिर आहे. जगावरील कोरोनाचे संकट दूर व्हावे म्हणून, भाविक भक्तांनी येथे नवरात्रीचे नऊ दिवस अखंडपणे 151 नंदादीप प्रज्वलित ठेवले आहेत. या देवीचे मूळ मंदिर हे बलुचिस्थान कराची येथे आहे.

तेथे या देवीला नांनी माँ म्हणून ओळखलं जात. त्याठिकाणी देवीच्या दर्शनाला जाण्यासाठीचा मार्ग अतिशय बिकट असून, दऱ्याखोऱ्यातून दर्शनासाठी जावे लागते. पण एवढ्या दूर अनेक भाविकांना दर्शन घ्यायला जाता येत नसल्याने हिंगुलांबीका मातेच्या मंदिराची प्रतिकृती परभणीत उभारण्यात आली आहे.

पाकिस्तानातील बलुचिस्थानात असलेल्या हिंगुलांबीका देवी भावसार मारवाडी समाजाच कुलदैवत आहे. मोठ्या श्रध्देने भाविक या देवीची पूजा अर्चा करीत असतात. ह्या देवीचे मंदिर हे देवींच्या 51 शक्ती पीठांपैकी एक शक्तीपीठ आहे. शिवाय श्रीरामाने रावणाचा वध केल्यानंतर या ठिकाणी येऊन देवीची पुजा अर्चा केली होती. अशी आख्यायीका देखील आहे. पण फाळणीनंतर सदर देवीच मंदिर पाकिस्तानात गेलं आहे. त्यामुळे आता देवीच्या सर्वच भाविकांना बलुचिस्थानात देवीचे दर्शन घेण्यासाठी जाण शक्य होत नसल्याने, हिंगुलांबीका मातेची प्रतिकृतीच परभणी शहराच्या दत्तधाम परिसरातील कुलस्वामिनी नगरात भव्य असं मंदिर उभारलं आहे.

या मंदिरातील हिंगलाजा मातेची मूर्ती ही सिंहावर आरुढ आहे. देवीच रूप हे अतिशय देखणं आणि प्रसन्न असून, भाविकांना मातेची मूर्ती ओजस्वी वाटते. या मंदिरात दरवर्षी मोठ्या उत्सवात नवरात्रीचा उत्सव साजरा केला जातो. यात भाविकांची प्रचंड रीघ असते. शिवाय दसरा उत्सव हा तर भाविकांसाठी आनंदाचा मेळावाच असतो. परंतु कोरोनामुळे अत्यंत साध्या पद्धतीने यावर्षीचा नवरात्री उत्सव साजरा केला जात आहे. मंदिरात मास्क न वापरणाऱ्या आणि कोरोनाचे नियम न पाळणाऱ्या भाविकांना प्रवेश दिला जात नाहीये. मंदिरामध्ये देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये कोरोना आणि प्रतिबंधक लसीकरण याच्या जनजागृतीसाठी माहितीचे विविध पोस्टर मंदिर परिसरात लावल्यात आले आहेत.

शिवाय जगावरील कोरोनाच संकट दूर व्हावं म्हणून या मंदिरात शेकडो नंदादीप सलग नऊ दिवस अखंडपणे तेवत ठेवले जात आहेत. सदर मंदिर समितीने सामाजिक उपक्रम राबवत समाजातील गरीब पण होतकरू विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन दरवर्षी आर्थिक स्वरूपाची मदत करीत असते, आतापर्यंत 18 विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची मदत मंदिर संस्थानच्या वाटून करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...