आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:बस स्थानकाच्या इमारतीच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरल्याने भाजपच्या आंदोलनाच्या इशाऱ्याची हवा गुल

हिंगोलीएका दिवसापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली येथील बसस्थानकाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरल्यानंतर भाजपाच्या आंदोलनाच्या इशाऱ्याची हवा गुल झाली आहे. ता. १७ सप्टेंबर रोजी या इमारतीचे उद्घाटन परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते होणार आहे.

हिंगोली येथे बसस्थानकाची अध्यावत इमारत बांधण्यात आली आहे. मात्र यामुळे या इमारतीचे उद्घाटन झाले नाही. मागील काही दिवसांपासून ही इमारत उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होती. कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेली इमारत उद्घाटनाच्या प्रतिक्षेत असल्याने प्रवाशांसाठी उभारलेल्या तात्पुरत्या शेडचा आसरा घ्यावा लागत होता. त्यातच पावसाळ्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. त्यामुळे प्रवाशांना विशेषतः महिला प्रवाशांची मोठी अडचण होत होती.

दरम्यान या इमारतीचे तातडीने उद्घाटन करा अन्यथा ता. १७ सप्टेंबर रोजी भाजपच्या वतीने इमारतीचे उद्घाटन केले जाईल असा इशारा भाजपाचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी दिला होता. त्यामुळे इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमात कडे सर्वांचे लक्ष लागले होते.

मात्र शासनाने ता. १७ सप्टेंबर रोजी बसस्थानकाच्या इमारतीचे उद्घाटन करण्याचा निर्णय घेतला. या इमारतीचे उद्घाटन परिवहन मंत्री अनिल परब यांच्या हस्ते होणार असून यावेळी पालकमंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले, खासदार हेमंत पाटील, आमदार तानाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, आमदार राजू नवघरे यांच्यासह मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

दरम्यान आघाडी सरकारने ता. १७ सप्टेंबर रोजी बसस्थानकाच्या उद्घाटनाचा मुहूर्त ठरवून भाजपच्या आंदोलनाच्या इशाऱ्याची हवाच काढून घेतली आहे. या प्रकाराची जोरदार त्याच्या जिल्हाभरात सुरू झाली आहे. त्यामुळे आता भाजपकडून जिल्ह्यातील इतर प्रश्नावर आंदोलन उभे करण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...