आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:गणेशमूर्ती विसर्जनासाठी सात कृत्रिम तलाव व दोन फिरत्या कृत्रिम तलावांची निर्मिती : मुख्याधिकारी अजय कुरवाडे यांची माहिती

हिंगोलीएका दिवसापूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली शहरात गणेश मूर्ती विसर्जनासाठी पालिकेच्या वतीने सात कृत्रिम तलाव व दोन फिरते कृत्रिम तलाव तयार केले आहे. शहरातील सर्व प्रभागातून कृत्रिम तलाव फिरवली जाणार असल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. अजय कुरवाडे यांनी दिली आहे.

हिंगोली शहरामध्ये गणेशमूर्ती विसर्जनाचे वेध लागले आहेत. कोविडच्या नियमांचे पालन व्हावे यासाठी प्रशासनाकडूनही तयारी केली जात आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी गणेशमूर्ती विसर्जन बाबत सविस्तर सूचना दिल्या आहेत.

दरम्यान हिंगोली पालिकेने शहरातील सार्वजनिक व घरगुती गणेशमूर्ती विसर्जन बाबत नागरिकांना सोयीचे व्हावे तसेच विसर्जनाच्यावेळी गर्दी होऊ नये यासाठी कृत्रिम तलाव तयार केले आहेत.

यामध्ये सात कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहे तसेच दोन फिरते कृत्रिम तलावही तयार केले आहे. एका कृत्रिम तलावांमध्ये १ १२ हजार लिटर पाणी भरले जाणार आहे. सदर कृत्रिम तलावातील पाणी सहा फूट उंचीचे होणार आहे. सार्वजनिक गणेश मूर्तीची उंची चार फूट व घरगुती गणेशमूर्तीची उंची दोन फूट असल्यामुळे या तलावामध्ये गणेशमूर्ती विसर्जन करणे सोयीचे होणार असल्याचे डॉ. कुरवाडे यांनी सांगितले.

यासोबतच दोन फिरते कृत्रिम तलाव देखील तयार करण्यात आले आहेत. हे तलाव शहरातील सर्व भागांमधून फिरवले जाणार आहेत. कोविडची पार्श्वभूमी लक्षात घेता गणेशमूर्ती विसर्जनासाठी भाविकांची गर्दी होऊ नये यासाठी कृत्रिम तलावाचा निर्णय घेण्यात आला आहे. याशिवाय सात ठिकाणी ठेवल्या जाणाऱ्या कृत्रिम तलावाच्या ठिकाणी अमृतकलश कुंड ठेवले जाणार आहे. या कलशामध्ये निर्माल्य जमा केले जाणार असल्याची डॉक्टर कुरवाडे यांनी सांगितले. दरम्यान आज जलेश्वर तलाव व सिरेहकशाह बाबा तलावाच्या ठिकाणी भेट देऊन पाहणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

नागरिकांनी कृत्रिम तलावातच गणेशमूर्ती विसर्जन करावे : डॉ. अजय कुरवाडे, पालिका मुख्याधिकारी हिंगोली
हिंगोली पालिकेने तयार केलेले कृत्रिम तलाव शहरातील तिरुपती नगर, आदर्श कॉलनी, रिसाला बाजार, शिवाजीनगर, जुने पालिका कार्यालय, एनटीसी, गांधी चौक या ठिकाणी ठेवले जाणार आहे. तर कृत्रिम फिरते तलाव शहरात फिरणार आहेत. या ठिकाणी पालिकेचे कर्मचारी देखील हजर राहणार आहेत. नागरिकांनी या कृत्रिम तलावांमध्ये गणेशमूर्तीचे विसर्जन करून गर्दी टाळावी.

बातम्या आणखी आहेत...