आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हिंगोली:अतिक्रमण हटाव मोहिमेचे पथक पोहोचतात हातगाडीवाल्यांची धावपळ, 20 हातगाडे अन टपऱ्या जप्त

हिंगोली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शहरात अतिक्रमण होऊ देणार नाही : डॉ. अजय कुरवाडे, पालिका मुख्याधिकारी

शहरात रामलीला मैदानाच्या परिसरामध्ये रविवारी ता. १२ सकाळी पालिकेचे अतिक्रमण हटाव पथक  पोहोचताच हातगाडीवाल्यांची चांगलीच धावपळ झाली. यावेळी पथकाने २० हातगाडे व पान टपऱ्या गाड्या जप्त केल्या आहेत. पालिकेच्या या कारवाईमुळे अतिक्रमण करून हातगाडी उभे करणार्‍यांचे धाबे दणाणले आहे.

हिंगोली पालिकेत नव्याने रुजू झालेले डॉ. अजय कुरवाडे यांनी मागील चार  दिवसात शहरातील कामकाजाचा आढावा घेतला. शहरातील कुठल्या भागांमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे, शहरातील अतिक्रमण आजचा भाग कोणता याची माहिती घेतली. तत्कालीन मुख्याधिकारी रामदास पाटील यांनी अतिक्रमण हटाव मोहीम राबवली. मात्र त्यांची बदली झाल्यानंतर रामलीला मैदानाच्या परिसरामध्ये पुन्हा अतिक्रमण होण्यास सुरुवात झाली. काही जणांनी रामलीला मैदानाच्या संरक्षक भिंती जवळ हातगाडे व पानटपऱ्या उभ्या केल्या. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. 

सदर प्रकार लक्षात आल्यानंतर आज मुख्याधिकारी डॉ.अजय कुरवाडे, पालिकेचे कर्मचारी बाळू बांगर, डी.पी. शिंदे , पंडित मस्के , विनय साहू यांच्यासह अतिक्रमण हटाव मोहिमेच्या पथकाने सफाई कर्मचाऱ्यांसह अतिक्रमण हटवण्यासाठी शहरातील महात्मा गांधी चौकात धाव घेतली. त्यानंतर या ठिकाणी असलेले अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली. रामलीला मैदानाच्या बाजूला संरक्षण भिंती जवळ उभे करण्यात आलेल्या हातगाड्यावाल्यांची यामुळे चांगलीच धावपळ झाली.

पालिकेच्या अचानक झालेल्या मोहिमेची ज्यांना माहिती मिळाली नाही त्यांचे हातगाडे व पानटपऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत. सुमारे २० पेक्षा अधिक हातगाडे व टपऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत. या अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे अतिक्रमण धारकाचे मनसुबे धुळीस मिळाली आहे.

शहरात अतिक्रमण होऊ देणार नाही : डॉ. अजय कुरवाडे, पालिका मुख्याधिकारी

हिंगोली शहरांमध्ये वारंवार होणार्‍या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत अतिक्रमण होऊ देणार नाही. शहरात पालिकेच्या पथकाकडून अतिक्रमण हटाव मोहीमेची कारवाई सुरू केली जाणार असून वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण करणार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जातील..

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser