आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली:खरबी येथे मारहाणीच्या दोन वेगवेगळ्या घटनेत 17 जणांवर गुन्हा दाखल, ग्रामपंचायत निवडणुकीचे कारण

हिंगोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • या प्रकरणी ज्योती पवार यांच्या तक्रारीवरून आठ जणांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हिंगोली तालुक्यातील खरबी येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून हाणामारीचा दोन वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत याप्रकरणी १७ जणांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात शुक्रवार ता. १७ गुन्हा दाखल झाला आहे. हिंगोली तालुक्यातील खरबी येथील मागील काही दिवसांपासून ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून दोस्तो सुरू आहे. या प्रकारामध्ये एकमेकांवर कुरघोडी करण्याचे प्रयत्न देखील चालू आहेत. यातून वादाच्या घटना घडल्या आहेत. मात्र हे वाद काही काळापुरतेच मर्यादित राहिले होते.

दरम्यान ग्रामपंचायत सदस्य ज्योती पवार व त्यांचे कुटुंबीय गुरुवार तारीख 16 सायंकाळी घरासमोर बसले होते यावेळी गावातील प्रकाश सखाराम बोचरे, हनुमान एकनाथ बोचरे, गजानन काशिनाथ बोचरे, गोविंद त्र्यंबक बोचरे, जगन रामकिशन बोचरे, सुभाष श्रीराम बोचरे, हनुमान राघोजी बोचरे, विनोद शिवाजी बोचरे यांनी काठ्या लोखंडी गजाने मारहाण केली यामध्ये ज्योती पवार व त्यांचे कुटुंबीय जखमी झाले.या प्रकरणी ज्योती पवार यांच्या तक्रारीवरून आठ जणांवर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान याच ठिकाणी गावातील सुमन चव्हाण यांना निवडणुकीत विरोधकांचा प्रचार का केला या कारणावरून नऊ जणांनी मारहाण केली. याप्रकरणी चव्हाण यांच्या तक्रारीवरून रामदास सपाटे, देवानंद सपाटे, विष्णू सपाटे, प्रकाश सपाटे, नामदेव सपाटे, बद्री बोचरे, कुंडलिक सपाटे, एकनाथ सपाटे, बालाजी सपाटे यांच्याविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधीक्षक राकेश कलासागर सहायक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक विवेकानंद वाखारे, पोलीस निरीक्षक आर. एन. मळघणे, उपनिरीक्षक किशोर पोटे, जमादार एस. एन. पोले, रविकांत हारकळ, अशोक धामणे, गजानन पोकळे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर गावातील तणाव निवळला. पोलिसांनी आता आरोपीचे अटक सत्र सुरू केले आहे.

बातम्या आणखी आहेत...